मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने एक्स पोस्ट करत त्यांची मुलगी साराबद्दल मोठी अपडेट दिली आहे. सारावर मोठी जबाबदारी दिल्याचे त्यांनी या पोस्टमधून सांगितले आहे.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये (STF) त्याची मुलगी सारा त्याच्यासोबत सामील झाली आहे असे तेंडुलकर यांनी सांगितले आहेत. 27 वर्षांची सारा सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये डायरेक्टर पदावर रुजू झाली आहे. सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून काम करणार असल्याची अधिकृत घोषणा सचिन तेंडुलकर यांनी केली आहे.
साराने लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रीडा, आरोग्यसेवा आणि शिक्षण याद्वारे भारताला सक्षम बनवण्याच्या या प्रवासाला तिने सुरुवात केली असताना, जागतिक शिक्षण कसे पूर्ण होऊ शकते याची आठवण करून देणारे आहे असे सचिन तेंडुलकर यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची स्थापना सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी 2019 मध्ये केली होती. हे फाऊंडेशन मुलांना समान संधी सिद्ध करण्याच्या दिशेने कार्य करते. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन 2019 पासून विविध भागांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात काम करते. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनकडून सिहोर जिल्ह्यातील पाच केंद्र दत्तक घेण्यात आली आहेत. त्यानुसार नयापुरा, खापा, बेलपाटी, जामुनझील आणि सेवानिया ही 5 केंद्र दत्त घेण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये 3 ते 15 या वयोगटातील मुलांना शिक्षण आणि मोफत जेवण दिलं जातं.