मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी क्रिकेट ग्राउंड'मध्ये होणार आहे. भारताने मालिकेत २-० ची आघडी घेतली आहे. कट्टकमधला सामना जिंकून भारताने मालिका स्वतःच्या खिश्यात टाकली आहे. मालिका जिंकल्याने तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ नवीन खेळाडूंना संधी देऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाच्या दृष्टीने ही उत्तम बाब आहे.
भारतीय संघाची एकदिवसीय मालिकेत कामगिरी उत्तम राहिली आहे. बहुतेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. हे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा शेवटचा सामना असणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
तिसऱ्या सामन्यात अर्षदिप सिंघल हर्षित राणाच्या जागी खेळण्याची संधी मिळू शकते. अर्षदिप भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात आहे. तसेच, केएल राहुलच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला संधी मिळू शकते. तसेच शुभमन गिलने दोन्ही सामन्यात अर्धशतकीय खेळी केल्या होत्या. त्याला आराम देऊन सलामीला यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळू शकतं . जैस्वाल मालिकेचा पहिला सामना खेळला होता. त्या सामन्यात जैस्वालने पदार्पण केले होते. मात्र जास्त प्रभाव तो टाकू शकला नव्हता. त्याचसोबात अष्टपैलू फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला अक्षर पटेलच्या जागी स्थान मिळू शकतं. सुंदरदेखील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात समाविष्ट केला गेला आहे. कुलदीप यादवचं तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकतं. त्याला रवींद्र जडेजाच्या जागी स्थान मिळू शकतं.
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही ?
या सामान्यत विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष राहील. विराटकडून मोठ्या खेळीची अपॆक्षा भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि चाहत्यांना असेल. विराट सारख्या खेळाडूला एकच सामना फॉर्म मध्ये यायला पुरे ठरू शकतो. विराट कोहली जर चांगल्या लयीत आला तर भारतीय संघाला अजून बळ मिळेल.
संभाव्य भारतीय प्लेयिंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती