अडिलेड - भारत आणि ऑस्टेलिया संघात बॉर्डर - गावस्कर करंडकाचा दुसरा सामना अडिलेडमध्ये सुरु आहे. हा सामना डे नाईट कसोटी सामना आहे.
पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अंती ऑस्ट्रेलिया 1 बाद 86 रन्स अशी परिस्थती होती. भारताचा संघ 180 धावांवर बाद झाला भारताकडून नितीश कुमार रेड्डी 42
धावा, केएल राहुल 37 धावा तर शुभमन गिलने 31 केल्या. कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून मोठ्या खेळीची अपॆक्षा होती पण दोघेही जास्त प्रभाव टाकू शकले नाही.
दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचे 2 गडी खेळाच्या पहिल्या तासातच बाद केले, नंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी भारताची चांगलीच धुलाई केली. ऑस्ट्रेलियाचा मर्नास लबुशेन आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात 50 धावांची साजेदारी झाली आणि नितीश कुमार रेड्डीने लबुशेनला बाद केलं. ट्रेव्हिस हेडने मात्र भारताची धुलाई चालूच ठेवली. हेडला दुसऱ्याबाजूने जास्त साथ कोणत्याच फलंदाजाची लाभली नाही. 111 चेंडूं खेळात हेडने आपलं शतक पूर्ण केलं. भारताविरुद्ध हे त्याच तिसरं शतक होत. ह्यापूर्वी देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप असो किंवा वर्ल्ड 2023 ची फायनल असो दोन्ही सामन्यात हेड भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. हेडने 141 चेंडूं 140 धावा केल्या आणि आपल्या संघाला 157 धावांची बहुमूल्य आघाडी मिळवून दिली.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने हेडचा त्रिफळा उडवला. सिराजने हेडला बाद करून आक्रमक 'सेंड ऑफ' दिला. त्यानंतर दोघांमध्ये शब्दांची देवाणघेवाण देखील झाली. खेळाच्या शेवटी जेव्हा हेडला विचारलं गेलं की सिराज आणि तुझ्यामध्ये नक्की काय झाला ? तेव्हा हेडने सांगितलं मी सिराजला बोललो चांगली गोलंदाजी केलीस तू मात्र, सिराजने काहीतरी चुकीचं ऐकलं आणि मला 'शेड' च्या दिशेने जाण्याचा इशारा केला. ह्या कृत्यांनंतर दुर्दैवाची बाब म्हणजे दोन्ही खेळाडूंना दंड म्हणून सामन्याच्या रकमेचा काही हिस्सा देखील गमवावा लागू शकतो.
https://x.com/mufaddal_vohra/status/1865363713274024331?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1865363713274024331%7Ctwgr%5E51a15d2de9e54950fb69f0600f2cb6e5be82dee8%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Ftravis-head-said-i-said-well-bowled-to-mohammad-siraj-but-i-think-he-misunderstood-me-1331393