Thursday, September 18, 2025 02:57:29 PM

World Athletics Championships 2025: जागतिक अ‍ॅथलेटिक्स भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला मोठं यश; पहिल्याच प्रयत्नात गाठली अंतिम फेरी

2023 मध्ये बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो अंतिम फेरीत आपले जेतेपद राखण्यास सज्ज आहे.

world athletics championships 2025 जागतिक अ‍ॅथलेटिक्स भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला मोठं यश पहिल्याच प्रयत्नात गाठली अंतिम फेरी

World Athletics Championships 2025: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात त्याने 84.85 मीटरचा थ्रो करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले.

हेही वाचा - IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला दुसरी वनडे : मंधानाची दमदार खेळी, भारताची स्थिर सुरुवात

नीरज चोप्रा सध्या या स्पर्धेचा गतविजेता आहे. 2023 मध्ये बुडापेस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा तो अंतिम फेरीत आपले जेतेपद राखण्यास सज्ज आहे. ही त्याची सलग पाचवी जागतिक स्पर्धा असून, पात्रतेसाठी त्याला फक्त एका थ्रोची गरज भासली.

हेही वाचा - Madan Lal On Mohammad Yusuf: 'सूर्यकुमार यादवचा अपमान हा मूर्खपणा'; मोहम्मद युसुफच्या वक्तव्यावर मदन लाल यांची प्रतिक्रिया

दरम्यान, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 87.21 मीटरचा थ्रो दुसऱ्या प्रयत्नात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तथापी, आता नीरज आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यातील लढत पुन्हा एकदा रंगणार आहे. 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये नदीमने 92.97 मीटरच्या विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते, तर नीरजने 89.45 मीटरच्या थ्रोवर रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे आगामी अंतिम फेरीत नीरजला आपला ऑलिंपिक पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री