Monday, September 01, 2025 04:39:51 AM

छे! उगाच ऐकलं त्याचं.. मी आऊट नव्हतोच! Rahul Dravid ला सचिनचा सल्ला मानल्याबद्दल वाटतेय खंत

ऑस्ट्रेलियन पंच सायमन टॉफेल यांनी त्यांना विकेटच्या मागे झेल देऊन आउट दिले होते. टॉफेलने पाच वेळा 'आयसीसी अंपायर ऑफ द इयर'चा किताब जिंकला होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर बहुतेकांना विश्वास असे.

छे उगाच ऐकलं त्याचं मी आऊट नव्हतोच rahul dravid ला सचिनचा सल्ला मानल्याबद्दल वाटतेय खंत

Rahul Dravid Sachin Tendulkar : महान भारतीय क्रिकेट खेळाडू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या खूप चर्चेत आहेत. रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या बाहेर येत आहेत. द्रविड यांनी अश्विनसमोर अनेक खुलासे केले. त्यांनी सध्याच्या टीम इंडिया, कोचिंगचा कार्यकाळ आणि टीम इंडियासाठी खेळलेल्या काळाबद्दल अनेक किस्से सांगितले. त्यांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी संबंधित एक किस्साही सांगितला. त्यांनी आजपर्यंतच्या त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना कोणत्या गोष्टीचा पश्चाताप वाटतो, हेदेखील सांगितले.

इंग्लंड दौऱ्याची घटना
द्रविड यांनी एका घटनेची आठवण सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, सचिन तेंडुलकरचा सल्ला मानल्याबद्दल त्यांना पश्चाताप वाटतो आहे. माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीत द्रविड म्हणाले की, 2011 मध्ये इंग्लंडच्या निराशाजनक दौऱ्यात जेव्हा त्यांना बाद देण्यात आले, तेव्हा त्याला डीआरएस (DRS - डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) न वापरल्याबद्दल पश्चात्ताप होतो. त्यावेळी सचिन तेंडुलकरनेही त्यांना डीआरएस न घेण्याचा सल्ला दिला होता. कारण, सचिनला वाटत होते, राहुल आऊट आहे. परंतु, नंतर रिप्लेमध्ये द्रविड नाबाद असल्याचे उघड झाले.

हेही वाचा - Cheteshwar Pujara Retirement: चेतेश्वर पुजाराने केली निवृत्तीची घोषणा; अचानक दिला सुवर्ण कारकिर्दीला ब्रेक

द्रविडला पंचांच्या निर्णयाचा रिव्ह्यू न घेतल्याचा पश्चात्ताप
अश्विनशी झालेल्या संभाषणात द्रविड यांनी आठवण सांगितली, "एकदा मला डीआरएस न घेतल्याचा पश्चात्ताप झाला होता. 2011 मध्ये इंग्लंडच्या एजबॅस्टन कसोटीदरम्यान हे घडले. मी जेम्स अँडरसनच्या चेंडूवर ड्राईव्ह मारला आणि मला आवाज ऐकू आला, पण बॅटवर चेंडू लागल्याचे जाणवले नाही. कधीकधी फलंदाज म्हणून तुम्हाला असे वाटते. मोठा आवाज आला होता. त्याच्या आधारेच पंचांनी 'बाद' हा निर्णय दिला होता. मलाही तो आवाज ऐकू आला होता. पण मला बॅटवर काहीही लागल्याचे जाणवले नव्हते.''

द्रविडचा सायमन टॉफेलवर विश्वास होता
ऑस्ट्रेलियन पंच सायमन टॉफेल यांनी त्यांना विकेटच्या मागे झेल देऊन आउट दिले होते. टॉफेलने पाच वेळा 'आयसीसी अंपायर ऑफ द इयर'चा किताब जिंकला होता. दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या सचिन तेंडुलकरशी बोलल्यानंतर द्रविडने पंचांच्या निर्णयाला आव्हान न देण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय चुकीचा ठरला. द्रविड आठवतो, ''एक आवाज आला होता. सायमन टॉफेल एक आदरणीय आणि चांगले पंच होते. जेव्हा ते निर्णय देत असत, तेव्हा त्यावर फारसे प्रश्न उपस्थित होत नसत. त्यांनी मला आउट दिले आणि मी सचिनकडे गेलो आणि म्हणालो की, मला बॅटवर काहीही लागल्याचे जाणवले नाही. ''

शूजच्या लेसमधून आवाज आला होता
द्रविड म्हणाला, ''सचिनने मला सांगितले की, खूप मोठा आवाज आला होता. यार राहुल, मला खात्री आहे की तू तो चेंडू मारलास आणि मलाही वाटले की, हो, असंच काहीतरी घडलं असेल. कारण, मीही तो आवाज ऐकला होता. ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर आणि रिप्ले पाहिल्यानंतर, द्रविडला लक्षात आले की, चेंडू बॅटवरून पूर्णपणे हुकला होता आणि तो आवाज प्रत्यक्षात त्याच्या बॅटने त्याच्याच बुटाच्या लेसला मारल्यामुळे झाला होता.

द्रविडने चांगल्या धावा केल्या, पण मालिका गमावली
2011 च्या त्या मालिकेत भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतरही, द्रविड संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला यजमान इंग्लंडकडून 4-0 असा पराभव पत्करावा लागला. द्रविडने चार कसोटी सामन्यांमध्ये 461 धावा केल्या, ज्यामध्ये तीन शतके समाविष्ट होती.

हेही वाचा - Virat Kohli: निवृत्ती की नवा डाव? विराटच्या तयारीने BCCI बुचकळ्यात


सम्बन्धित सामग्री