Thursday, August 21, 2025 04:39:18 AM

विराट कोहली का खेळला नाही नागपूरमधला एकदिवसीय सामना ?

विराट कोहलीच्या गैरहजेरीमुळे प्रेक्षक नाराज

विराट कोहली का खेळला नाही नागपूरमधला एकदिवसीय सामना

मुंबई: भारत आणि इंग्लंडमधील पहिला एकदिवसीय सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट ग्राउंडवर झाला. टी २० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष्य एकदिवसीय मालिका जिंकायचं असेल. 

भारताच्या एकदिवसीय आणि टी 20 संघात खूप बदल आहेत.4-5 खेळाडू सोडता सर्व खेळाडू वेगळे आहेत. या मालिकेचे मुख्य आकर्षण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आहेत. मात्र पहिल्या सामन्यात विराट कोहली खेळताना दिसला नाही. विराट कोहलीच्या नसण्याचे कारण थोडं गंभीरदेखील असू शकतं. विराट कोहलीच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे विराट कोहलीला पहिल्या सामन्याला मुकावं लागलं. विराट कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याचं अद्याप तरी स्पष्टीकरण आलं नाही आहे. विराट कोहीला 5 फेब्रुवारीच्या रात्री ही दुखापत झाली एवढंच कर्णधार रोहित शर्माकडून सांगण्यात आलं. 

विराट कोहली विश्व क्रिकेटमधील एक फिट आणि चपळ खेळाडू म्हणून ओळखला जातो. विराट कोहली क्वचितच दुखापतग्रस्त होतो. पण, कोहली पुढच्या सामन्यात पुनरागमन करेल अशा शक्यता आहेत. 

नागपूरच्या सामन्यात विराट कोहली मुकल्याने यशस्वी जैस्वालला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र जैस्वाल त्याच्या कामगिरीने जास्त प्रभाव टाकू शकला नाही. त्याने मात्र 15 धावा केल्या. भारत आणि इंग्लंडमधील दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना ओडिशामधील कट्टक येथे होणार आहे.  


सम्बन्धित सामग्री