लंडन: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या डेटिंगच्या चर्चा समोर येत आहे. जरी या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली नसली तरी युजर्सना वाटते की ते रिलेशनशिपमध्ये आहेत. धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर युजवेंद्र चहल आणि आरजे महवश बऱ्याचदा एकत्र दिसले. सध्या ते एकमेकांना फक्त चांगले मित्र म्हणतात. अशातच, हे जोडपे पुन्हा एकदा एकत्र दिसले. अलिकडेच चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की युजवेंद्र आणि आरजे महवश लंडनमध्ये एकत्र सुट्टीवर आहेत. यासह, दोघांनीही एकाच पार्श्वभूमीवरचे फोटो शेअर केले आहेत.
क्रिकेटपटू युजवेंद्रचा व्हिडिओ व्हायरल
@travelshotsbyanna नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत युजवेंद्र आणि महवश लंडनच्या रस्त्यांवर एकत्र फिरताना दिसत आहेत.
महवशने शेअर केली इन्स्टा स्टोरी
रविवारी, आरजे महवशनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चहलचा एक फोटो शेअर केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहले होते की, 'शेवटी यूकेमध्ये एका हिंदुस्थानी चेहऱ्यासह बनावट उच्चार नसलेला शूट झाला. तसेच, एक अनोळखी मुलगा युझीकडे आला आणि विचारला, ''तुमचा स्किनकेअर रूटीन काय आहे?'. युझी तिथे बसला आहे आणि त्याच्याकडे बघून लाजत आहे'.
युजवेंद्रने केली होती नात्याची पुष्टी
अलीकडेच, नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एका भागात क्रिकेटपटू युजवेंद्रने महवशसोबतच्या नात्याची कबुली दिली. यादरम्यान, युजवेंद्र क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत दिसला होता, जिथे एका हलक्याफुलक्या भागात अनपेक्षित वळण आले. कॉमेडियन किकू शारदाने युजवेंद्रला त्याच्या नात्याबद्दल विचारले की, 'कौन है वो लड़की?'. यावर चहल म्हणाला, 'भारत जान चुका है, 4 महीने पहले'. युजवेंद्रने दिलेल्या उत्तरवर चाहत्यांना असे वाटले की तो अप्रत्यक्षपणे महवाशसोबत आपल्या नात्याची पुष्टी करत आहे. 20 मार्च रोजी युजवेंद्र आणि धनश्रीचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर, आरजे महवशसोबत युजवेंद्र जवळीक साधण्यास सुरुवात केली.