लंडन: कपूर घराण्याची मुलगी आणि पटौदींची सून करीना कपूर आपल्या स्टायलिश अंदाजमुळे नेहमी चर्चेत असते. सोमवारी, अभिनेत्री करीना कपूरने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात, 'सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची आहे' असं कॅप्शन तिने लिहिले आहे. करिनाने इंटरनॅशनल ब्रँडला नाकारत कोल्हापुरी चप्पलला प्राधान्य दिल्यामुळे चाहत्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.
हेही वाचा: पुढील 48 तासात राज्यातील 'या' जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
नेमकं प्रकरण काय?
लंडनमध्ये करीना कपूर तिच्या कुटुंबीयांसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यान, करीनाने तिचा समुद्रकिनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीना आरामात बसली आहे आणि तिच्या पायात चमकदार सिल्वर कलरच्या कोल्हापुरी चप्पल दिसत आहे. करीनाने इंटरनॅशनल लग्झरी ब्रँडला अनोख्या अंदाजात टीका केली आहे आणि महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरीला पाठिंबा दिला आहे. 'सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची आहे', असं कॅप्शन करीनाने लिहिले आहे. या पोस्टमध्ये करीनाने हसण्याचा आणि मुक्का मारण्याच्या इमोजींसोबत, एक हार्ट इमोजी देखील करिनाने शेअर केला आहे. विशेष म्हणजे, करीनाने कोणतंही वक्तव्य न करता, फक्त एक फोटो शेअर करुन इंटरनॅशनल ब्रँडवर टीका केली आहे. हा फोटो पाहताच चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
हेही वाचा: TODAY'S HOROSCOPE: 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जाणून घ्या
प्राडा विरोधात कोल्हापुरी चप्पल
काही महिन्यांपूर्वी इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये त्यांच्या मेन्सवेअर स्प्रिंग/समर कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. कोल्हापुरातील कारागिरांनी या आलिशान चपलांबाबत शंका उपस्थित केली असून, जीआय मानांकन असूनही 'प्राडा' या आंतरराष्ट्रीय कंपनीने हुबेहूब कोल्हापुरी चप्पल जागतिक व्यासपीठावर कशी झळकवली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. इतकंच नाही, तर ज्या खाजगी कंपनीने कोल्हापुरी चप्पल जगासमोर आणली, त्याच कंपनीने कोल्हापुरी चपलेची किंमत 1 लाख 23 हजार रुपये ठेवली आहे. इतक्या मोठ्या कंपनीने इतकी मोठी चूक केल्याने कोल्हापूरकरांसह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. 'ही डिझाईन भारतातील चमार समुदायाकडून चोरण्यात आली आहे. ते पिढ्यान् पिढ्या या चप्पल हाताने विणून तयार करीत आहेत. त्यांना कोणतेही श्रेय दिलं गेलं नाही. ही लक्झरी ब्रँडिंगने केलेली चोरी आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया दुसऱ्या नेटिझनने दिली.