Monday, September 01, 2025 03:21:11 PM

Dark Web: डार्क वेबवर होते 'या' गोष्टींची खरेदी विक्री आणि तस्करी

डार्क वेब हा इंटरनेटचा एक गूढ आणि सामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध नसलेला भाग आहे. डार्क वेब इंटरनेटची एक काळी बाजू असून या इथे अनेक प्रकारच्या कायदेशीर आणि त्यासोबत बेकायदेशीर गोष्टी घडतात.

dark web डार्क वेबवर होते या गोष्टींची खरेदी विक्री आणि तस्करी

तंत्रज्ञानाच्या वाढत्या नवनवीन बदलांमुळे आपण कोणतीही माहिती इतंभूत आणि कमी वेळात मिळवू शकतो आणि त्यासाठी निरनिराळे स्रोत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच काही माध्यमांची (Srouce) माहिती आपण जाणून घेऊयात, 
तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची माहिती तुम्ही सरफेस वेब  (Surface Web ) म्हणजेच Google, Facebook, YouTube, Wikipedia वर सर्च करून मिळवत असता. तर दुसरी कडे डीप वेब (Deep Web) म्हणजॆच हा इंटरनेटचा असा भाग आहे जो सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. यामध्ये बँकिंग पोर्टल्स, सरकारी डेटाबेस, मेडिकल रेकॉर्ड्स, सबस्क्रिप्शन-आधारित कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतात. डीप वेब सुरक्षित आहे आणि बेकायदेशीर नाही, परंतु सामान्य लोकांना या माहितीपर्यंत सहज प्रवेश मिळत नाही. पण आता वेबची तिसरी आणि अत्यंत महत्वाची बाजू पाहिली तर डार्क वेब (Dark Web) सारख्या माध्यमांनी तुमच्या विचारापलीकडे असणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. 

हेही वाचा: Satellite Network: आता सॅटेलाइट नेटवर्कद्वारे मोबाईलवर व्हिडिओ कॉल करणं होणार शक्य; 'या' कंपनीची चाचणी यशस्वी

डार्क वेब म्हणजे काय? 
डार्क वेब हा इंटरनेटचा एक गूढ आणि सामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध नसलेला भाग आहे. डार्क वेब इंटरनेटची एक काळी बाजू असून या इथे अनेक प्रकारच्या कायदेशीर आणि त्यासोबत बेकायदेशीर गोष्टी घडतात. ज्या गोष्टींची एक साधारण माणूस कल्पना सुद्धा नाही करू शकत त्याच्यापेक्षाही अनेक पाऊल पुढे या डार्क वेबवर होतात.  हा वेबचा तो भाग आहे जो नियमित सर्च इंजिन्स (Google, Bing इत्यादी) द्वारे शोधता येत नाही. डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर, जसे की Tor (The Onion Router) किंवा I2P (Invisible Internet Project) यांचा वापर करावा लागतो.

डार्क वेब कश्याप्रकारे काम करते?

डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी टॉर ब्राउझरद्वारे म्हणजेच ओनियन राउटिंग तंत्रज्ञानाद्वारे साइन इन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे डार्क वेब वापरणाऱ्यांना त्यांची माहिती गुप्त ठेवण्यासाठी आणि ट्रॅकिंग ठेवण्यापासून संरक्षण करते. म्हणजेच डार्क वेबवर विविध आयपी ऍड्रेसद्वारे कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होते. त्यामुळे डार्क वेब वापरणाऱ्यांना ट्रॅक करणे पूर्णपणे अवघड होते. खरेदी - विक्रीसाठी इथे बिटकॉइनचा वापर केला जातो ज्यामुळे एकमेकांची माहिती दिसत नाही. 

हेही वाचा: Results About You: आता इंटरनेटवरून तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकणे होणार सोपे! गुगलने लाँच केले खास Tool
 

काय होते डार्क वेबमध्ये?

डार्क वेबमध्ये अनेक कायदेशीर आणि त्यासोबत बेकायदेशीर कामे होतात. शस्त्रांच्या खरेदी विक्रींपासून ते ड्रग्स, चाईल्ड पॉर्न, अवयव, मानवी आणि लहान मुलांची तस्करीपर्यंत अनेक गोष्टी घडतात. इथे तुम्ही कोणालाही मारण्यासाठी शार्पशूटर भाड्याने घेऊ शकता किंवा कोणाचेही अपहरण करायचे असल्यास तुम्ही इथून कोणत्याही अपहरण करणाऱ्यांना सुद्धा  भाड्याने घेऊ शकता. त्यासोबतच, तुम्ही दुसऱ्या देशाच्या गुप्त डेटासुद्धा जाणून घेऊ शकता.


सम्बन्धित सामग्री