सध्या अनेकांच्या हातात आपण स्मार्टफोन बघत आहोत. अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर आज्जी - आजोबांपर्यंत सर्वजण मोठ्या संख्येने स्मार्टफोन वापरतात. आजकाल अनेकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्स असावे अशी अपेक्षा बाळगतात. अशातच 2025 मध्ये स्मार्टफोन प्रेमींसाठी विविध ब्रॅण्ड्सने काही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यामध्ये आपल्याला नवनवे फीचर्स पाहता येईल. चला तर जाणून घेऊया कोण - कोणते स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.
1 - OPPO Reno13:
OPPO रेनो 13 हा स्मार्टफोन 9 जानेवारी 2025 रोजी लॉंच झाला असून यामध्ये आपल्याला नवनवे फीचर्स पाहता येईल. या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ (2 मीटर खोलीत 30 मिनिटांपर्यंत) आहे. त्यासोबतच या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रंट कॅमेरा 50 एमपी असून 5600 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग फीचर आहे. या स्मार्टफोनचे इंटर्नल स्टोरेज 128 जीबी पर्यंत आहे.
हेही वाचा: Dark Web: डार्क वेबवर होते 'या' गोष्टींची खरेदी विक्री आणि तस्करी
2 - Xiaomi Redmi Turbo 4:
Xiaomi Redmi Turbo 4 या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रंट कॅमेरा 20 एमपी आणि 50 एमपी रीअर कॅमेरा असून 6550 एमएएच बॅटरी आणि 90 वॅट फास्ट चार्जिंग फीचर असणार आहे. त्यासोबतच 12 जीबी रॅम असून 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असणार आहे. लवकरच हा फोन भारतामध्ये लॉंच होईल.
3 - Vivo X200 Pro Mini:
Vivo X200 Pro Mini या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रंट कॅमेरा 32 एमपी आणि 50 एमपी रीअर कॅमेरा असून 5700 एमएएच बॅटरी आणि 90 वॅट फास्ट चार्जिंग फीचर असणार आहे. त्यासोबतच Vivo X200 Pro Mini स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम असून 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असणार आहे. लवकरच हा फोन एप्रिल ते जून दरम्यान भारतामध्ये लॉंच होईल.
हेही वाचा: Results About You: आता इंटरनेटवरून तुमची वैयक्तिक माहिती काढून टाकणे होणार सोपे! गुगलने लाँच केले खास Tool
4 - Realme Neo 7:
Realme Neo 7 मध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळणार असून सूत्रांच्या माहितीनुसार हा स्मार्टफोन लवकरच 25 फेब्रुवारी 2025 रोजी भारतामध्ये लॉंच होईल. Realme Neo 7 या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रंट कॅमेरा 16 एमपी आणि 50+8 एमपी रीअर कॅमेरा 7000 एमएएच बॅटरी आणि 80 वॅट फास्ट चार्जिंग फीचर असणार आहे. Realme Neo 7 स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम असून 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असणार आहे.