टोकियो : जपानमधील टोयोक शहराच्या प्रशासनाने येथील रहिवाशांनी स्मार्टफोनचा वापर कमी करण्यासाठी प्रस्तावित नियम सादर (Smartphone Restrictions in Japanese City) केला आहे. हल्ली स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे विविध समस्या समोर येत आहेत. यामुळे लोकांनी जास्त प्रमाणात स्मार्ट फोन वापरणे बंद करावे आणि जागृती निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश आहे. जर नियमावर सहमती झाली तर तो ऑक्टोबरपासून टोयोकेमध्ये लागू केला जाईल.
या नियमानुसार, सर्व रहिवाशांना काम आणि अभ्यास व्यतिरिक्त स्मार्टफोनचा वापर फक्त दोन तास वापरण्याचे आवाहन केले जाईल. हा नियम अनिवार्य नाही आणि त्याचे उल्लंघन करणे कोणतीही शिक्षा किंवा दंड लावला जाणार नाही. तर, लोकांना स्क्रीन टाइम मॅनेजमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून हा नियम काम करेल. या नियमांनुसार, रात्री 9 नंतर लहान मुलांना आणि किशोरवयीन मुले आणि मोठ्यांना रात्री 10 वाजल्यानंतर स्मार्टफोन न वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.
हेही वाचा - Air Force Plane Crash: पायलट-इंजिनिअरमध्ये तासभर चर्चा; नंतर काही सेकंदातचं कोसळलं विमान, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
नियमातील मुख्य मुद्दे
मार्गदर्शक तत्त्वे, अनिवार्य नाही:
हा नियम फक्त एक सूचना आहे. याची अंमलबजावणी केली नाही तर किंवा तो लोकांनी स्वीकारला नाही तर, त्याबद्दल शिक्षा होणार नाही.
स्क्रीन टाईम कमी करण्यावर भर:
या नियमाचा उद्देश स्मार्टफोनचे व्यसन कमी करणे हा आहे. रात्री उशिरापर्यंत स्मार्टफोन वापरल्याने किंवा स्क्रीनसमोर राहिल्याने झोपेच्या समस्या निर्माण होतात. झोप कमी होते आणि सामाजिक संबंधांमध्येही कमकुवतपणा येऊ लागतो. या सर्व समस्यांमधून लोकांना बाहेर पडण्यास मदत करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे.
मुले आणि प्रौढांसाठी वेळ मर्यादा:
रात्री 9 नंतर मुलांना स्मार्टफोन दूर ठेवण्याची आणि रात्री 10 नंतर किशोरवयीन मुले आणि प्रौढ स्मार्टफोन न वापरण्यास सुचवले आहे.
प्रस्तावित तारीख:
'शहराची विधानसभा लवकरच एका मसुदा अध्यादेशावर मतदान करेल जो रहिवाशांना कामाच्या आणि शाळेच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकांवर दोन तास घालवण्याची परवानगी देईल, अशी घोषणा टोयोकेचे महापौर मासामी कोकी यांनी केली.
या नियमाला कायदेशीर मान्यता मिळाली तर, हा नियम ऑक्टोबरमध्ये लागू होऊ शकतो. असा नियम 2020 मध्ये जपानी शहर कागावा येथे आधीच बनवण्यात आला आहे आणि अंमलात आणण्यात आला आहे.
पालिकेचे विधानः
टोयोकचे महापौर म्हणाले की शहर रहिवाशांच्या हक्कांवर मर्यादा घालणार नाही. परंतु, स्मार्टफोनच्या वापराबद्दल चर्चा करण्याची आणि विचार करण्याची संधी कुटुंबांना दिली जाईल.
नियम का?
टोयोक शहरात स्मार्टफोनचा अधिक वापर होत आहे. विशेषत: मुलांमध्ये ही एक मोठी समस्या बनली आहे. स्मार्टफोनच्या अत्यधिक वापरामुळे झोप आणि समाजापासून दूर होण्याची समस्या कमी करण्यासाठी शहराच्या सरकारने हे पाऊल उचलले आहे.
'देशातील तरुण लोक त्यांच्या फोन, टॅब्लेट आणि संगणकांवर दिवसातून सरासरी पाच तास घालवतात, हे मार्चमध्ये जपानमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले. फोनचा जास्त वापर झोपेच्या समस्या आणि मानसिक आरोग्यावर परिणाम यासारख्या समस्या निर्माण करू शकतो, असे कोकी यांनी म्हटले आहे.
जपानच्या टोयोके शहरात फोनबाबत बनवण्यात येणाऱ्या नियमांमध्ये शिक्षा किंवा दंडाची कोणतीही तरतूद नसली तरी, हे नियम केवळ लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आले आहेत. तरीही लोक संतापले आहेत.
हेही वाचा - Kokichi Akuzawa: जगाला थक्क करणारी जिद्द! 102 वर्षीय कोकिची अकुझावा ठरले माउंट फुजी सर करणारे सर्वात वयस्कर पर्वतारोही