Sunday, August 31, 2025 11:34:05 AM

Trump's Tariff War: ट्रम्पचा आणखी एक धक्का! परदेशातून येणाऱ्या छोट्या पॅकेजवरील करसवलत रद्द

अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या लहान पार्सलवरील करसवलत रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी 800 डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पार्सलवर टॅरिफ सूट मिळत होती, परंतु आता ती सुविधा संपली आहे.

trumps tariff war ट्रम्पचा आणखी एक धक्का परदेशातून येणाऱ्या छोट्या पॅकेजवरील करसवलत रद्द

Trump's Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘टॅरिफ वॉर’ हे जगभर चर्चेत असलेले प्रकरण आता आणखी एका वळणावर पोहोचले आहे. विविध देशांवर टॅरिफ लादल्याने ट्रम्प यांच्यावर जागतिक पातळीवर टीका होत असतानाही त्यांनी आपल्या धोरणात बदल करण्यास नकार दिला आहे. या टॅरिफ वॉरचा परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारावरच नव्हे तर अमेरिकन ग्राहकांवरही थेट होणार आहे.

परदेशातून येणाऱ्या छोट्या पार्सलवरील सूट संपली

नवीन निर्णयानुसार, अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या लहान पार्सलवरील करसवलत रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 12:01 पासून यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन विभागाने सर्व आंतरराष्ट्रीय पॅकेजेसवर, त्यांचे मूल्य काहीही असो, मानक शुल्क दर लागू करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी 800 डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पार्सलवर टॅरिफ सूट मिळत होती, परंतु आता ती सुविधा संपली आहे.

हेही वाचा - Restrictions on Smartphone Use : स्मार्टफोनचा वापर अति झालाय! या देशात बनवला जातोय 'असा' खास नियम

छोटे व्यापारी आणि ग्राहकांवर परिणाम

या निर्णयाचा परिणाम सर्वात जास्त लहान व्यापारी आणि ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मते, पुढील सहा महिन्यांच्या संक्रमण कालावधीत पॅकेज पाठवणाऱ्यांना मूळ देशानुसार फ्लॅट फी भरावी लागेल. प्रति पॅकेज 80 ते 200 डॉलर इतके शुल्क आकारले जाईल, जे मूळ देशातील लागू टॅरिफ दर किंवा प्रत्येक वस्तूसाठी निश्चित रक्कम यांपैकी जे जास्त असेल ते. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून वस्तू आयात करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

हेही वाचा - PM Modi to Meet Xi Jinping: भारताची रणनीती! पंतप्रधान मोदी 31ऑगस्टला घेणार शी जिनपिंग यांची भेट

या निर्णयाबद्दल विचारले असता ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही सवलत पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. हा बदल कायमस्वरूपी असून भविष्यात त्यावर पुनर्विचार केला जाणार नाही. ट्रम्प यांचा हा निर्णय आधीच तणावग्रस्त असलेल्या जागतिक व्यापार संबंधांना आणखी गुंतागुंतीचे बनवू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरून अमेरिकेत वस्तू आयात करणाऱ्या लाखो ग्राहकांवर व व्यवसायांवर याचा थेट आर्थिक परिणाम होईल. यामुळे अमेरिकन बाजारपेठेत महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री