Sunday, August 31, 2025 06:04:16 AM

Rinku Rajguru : कृष्णराज महाडिकांसोबतच्या कोल्हापुरातल्या 'त्या' फोटोबद्दल आर्ची म्हणाली; 'मी लग्न करेन...'

कृष्णराज महाडिक यांनी एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटोमुळे त्यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

rinku rajguru  कृष्णराज महाडिकांसोबतच्या कोल्हापुरातल्या त्या फोटोबद्दल आर्ची म्हणाली मी लग्न करेन

Rinku Rajguru-Krishnaraaj Mahadik Photo : 'सैराट' चित्रपटातून पदार्पण केलेल्या रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru) चाहतावर्ग मोठा आहे. सध्या रिंकूचे अनेक चाहते तिच्या लग्नाबद्दलच्या अपडेटची वाट पाहात आहेत. आर्ची कुणाच्या गळ्यात माळ घालणार, याची चर्चा अनेक महिन्यापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तिचा भाजपचे कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक याच्यासोबतचा एक फोटो समोर आला होता. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

याबद्दल रिंकू राजगुरूने तिचं म्हणणं उघडपणे सांगितलंय. रिंकू आणि कृष्णराज महाडिक यांचा कोल्हापुरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात काढलेला फोटो व्हायरल झाला होता. कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिले होते, 'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.' यानंतर हा फोटो व्हायरल झाला.

हेही वाचा - Ganeshotsav 2025 : घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम! गणेशोत्सवासाठी गोविंदा अन् सुनीता एकत्र

या फोटोमुळे त्यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या व्हायरल फोटोवर खुद्द रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच स्पष्टीकरण (Rinku Rajguru Reaction On Photo With Krishnaraaj Mahadik) दिलं आहे. कृष्णराज महाडिकांसोबतच्या त्या व्हायरल फोटोविषयी बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली "मी तो फोटो शेअर केलाच नव्हता. खरं तर आपण कुठेही जातो, तिथं लोक फोटो काढले जातात. तसंच हा फोटो त्यांच्या टीमने काढला होता आणि शेअर केला". पुढे ती म्हणाली, "आपल्या आयुष्यात तर हे रोजच घडतं. माझ्यासाठी हे सगळं काही नवीन नाही. मला वाटतं की, त्याची इतकी चर्चा करण्याची गरज नाहीये".

याशिवाय, रिंकू तिच्या लग्नाच्या चर्चांविषयीही बोलताना म्हणाली, "माझं लग्न ठरेल तेव्हा मी स्वत: सांगेन.' 'याआधीही अशा लग्नाच्या चर्चा कित्येकवेळा झाल्यात. त्यामुळं अशा चर्चांचा आता जास्त त्रास होत नाही,' असे सांगायलाही ती विसरली नाही.

दरम्यान, रिंकूसोबतच्या फोटोवर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले होते की, "आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पण सगळ्यांना वाटतंय तसं काहीच नाहीये".
'सैराट' चित्रपटात रिंकू आणि आकाश ठोसरची जोडी खूप गाजली. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याची अनेकदा चर्चा होते. मात्र, रिंकूने कायम या चर्चांना नकार दिला आहे. एका मुलाखतीत 'होणारा जोडीदार कसा असावा,' याबद्दल बोलताना रिंकूने खूप सकारात्मक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. 'सगळ्या मुलींना जे हवं असतं तेच की तो आदर देणारा आणि काळजी घेणारा असावा. गृहित धरणारा नसावा,' असं ती म्हणाली होती.

हेही वाचा - Ganeshotsav 2025 : यंदा शिल्पा शेट्टीच्या घरी गणेशोत्सव नाही होणार साजरी; कारण सांगताना म्हणाली, 'आम्हाला सांगण्यास...'


सम्बन्धित सामग्री