Monday, September 01, 2025 09:22:55 AM

स्पीडमध्ये असलेली Bike थांबवण्यासाठी एकत्र गिअर डाउन करत असाल तर होईल मोठं नुकसान!

Bike Tips and Tricks: आपण अनेक गोष्टींमध्ये शॉर्टकट मारत असतो. असाच शॉर्टकट तुम्ही बाईक थांबवताना मारत असाल तर, सावधान ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. म्हणजे काय? ही कोणती सवय आहे? चला, जाणून घेऊ..

स्पीडमध्ये असलेली bike थांबवण्यासाठी एकत्र गिअर डाउन करत असाल तर होईल मोठं नुकसान

Bike Tips and Tricks: तुम्हाला गर्दीच्या वेळी किंवा अचानकपणे किंवा इच्छित स्थळी पोहोचल्यावर गाडी थांबवायची असेल तर, तुम्ही त्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करत नाही ना? बाईक चालक असाल, तर तुम्ही बाईक चालवत असताना तुम्ही एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

जर तुम्ही बाईक रायडर असाल आणि जास्त वेगाने जात असताना अचानक सर्व गीअर्स खाली करून तुमची बाईक झटकन थांबवली तर, लक्षात घ्या, की ही पद्धत योग्य नाही. इथून पुढे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे, नाहीतर, भविष्यात मोठं नुकतान होईल. खरं तर तुम्हाला वाटेल की, सर्व गीअर्स खाली आणल्यामुळे बाईक लगेच थांबेल पण त्यामुळे इंजिन धोक्यात येते.

हेही वाचा - तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? या 5 सोप्या गोष्टी फॉलो करा, नक्की फायदा होईल

गिअर्स जलदपणे खाली हलवणे का वाईट आहे?
तुम्ही बाईक थांबवण्यासाठी सर्व गियर लवकर खाली केले तर, तुमच्या बाईकच्या इंजिनवर जास्त दबाव येतो. इतकेच नाही तर, इंजिन गरम झाल्यामुळे मायलेज देखील वेगाने कमी होते. जर तुम्ही हे खूपच जास्त वेगाने केले तर गियर तुटू शकतो किंवा वारंवार असे करण्यामुळेही गियर तुटू शकतो. अपघातही होऊ शकतो किंवा असे नाही झाले तरी गियरबॉक्सचे मोठे नुकसान होतेच होते.

या पार्ट्सना होते नुकसान  
तुम्ही बाईकचा गिअर पटकन बदलला तर क्लच प्लेटला नुकसान होते. क्लच प्लेट खराब होऊ लागते आणि त्याच वेळी, त्यामुळे इंजिनच्या इतर घटकांचे नुकसान होते.

तुम्ही तुमच्या बाईकचा गिअर डाउनशिफ्ट करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही वेग कमी करून फक्त एका गिअरने डाउनशिफ्ट करा. त्यानंतर, जसजसा वेग कमी होत जाईल. तसतसे तुम्ही त्यानुसार खालच्या गियरवर जावे. असे केल्याने तुमच्या बाईकच्या इंजिनवर कोणताही वाईट परिणाम होत नाही आणि तिचे मायलेजही चांगले राहते. तेव्हा, एकाच वेळी गिअर्स खाली करून तुमची बाईक थांबवत असाल तर आजपासूनच ही सवय बदला.

हेही वाचा - इंटरनेटशिवायही YouTube वापरता येईल आणि डेटाही वाचेल; जाणून घ्या कसे..


सम्बन्धित सामग्री