Monday, September 01, 2025 07:01:58 PM

स्मार्टफोन वापणाऱ्या लाखो यूजर्संना धोका! 28 अॅप्समध्ये आढळला SparkCat नावाचा धोकादायक व्हायरस

हे मालवेअर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना लक्ष्य करत आहे. म्हणून, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

स्मार्टफोन वापणाऱ्या लाखो यूजर्संना धोका 28 अॅप्समध्ये आढळला sparkcat नावाचा धोकादायक व्हायरस
SparkCat Virus Found In 28 Apps
Edited Image

SparkCat Virus Found In 28 Apps: स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की, जर तुमच्याकडे आयफोन असेल तर तो व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित आहे, तर असं अजिबात नाही. सध्या, स्मार्टफोनमध्ये एक नवीन विषाणू वेगाने पसरत आहे. हे मालवेअर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना लक्ष्य करत आहे. म्हणून, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कॅस्परस्कीच्या एका अहवालानुसार, सध्या अनेक अॅप्समध्ये एक अतिशय धोकादायक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) दिसून आली आहे. 

SDK च्या या धोकादायक व्हायरसचे नाव SparkCat आहे. एसडीके सध्या गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या अनेक अॅप्सना लक्ष्य करत आहे. आतापर्यंत स्मार्टफोनमधील 28 अॅप्समध्ये SparkCat व्हायरस आढळला आहे. स्पार्ककॅट नावाचा हा व्हायरस ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोकरन्सी वॉलेट रिकव्हरी चोरण्यासाठी डिझाइन केला आहे. 

हेही वाचा - तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते? हे 10 अ‍ॅप्स आहेत कारणीभूत!

प्राप्त माहितीनुसार, सुमारे 2.42 लाख लोकांनी गुगल प्ले स्टोअरवरून स्पार्ककॅटने संक्रमित अॅप्स डाउनलोड केले आहेत. आतापर्यंत स्पार्ककॅट सुमारे 18 अँड्रॉइड अॅप्स आणि 10 आयओएस अॅप्समध्ये आढळले आहे. त्यामुळे तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. SparkCat ChatAi अॅपमध्ये आढळल्याची पुष्टी झाली आहे. जर तुम्ही हे डाउनलोड केले असतील तर ते ताबडतोब अनइंस्टॉल करा आणि डिलीट करा. अन्यथा यामुळे तुम्हाला मोठे नुकसान पोहचू शकते. 

हेही वाचा - Countries Banning Deepseek: 'या' देशांनी घातली डीपसीकच्या वापरावर बंदी; काय आहे नेमकं यामागचं कारण? जाणून घ्या

SparkCat व्हायरस नेमकं काय करतो? 

हा मालवेअर वापरकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये असलेली प्रतिमा स्कॅन करतो आणि चोरतो. बहुतेक वापरकर्ते लक्षात राहण्यासाठी अनेकदा आपल्या फोनमध्ये ट्रान्झक्शन किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींचा स्क्रीनशॉट घेतात आणि तो संग्रहित करतात. स्पार्ककॅट गुगल एमएल किट ओसीआर वापरून हे स्क्रीनशॉट स्कॅन करते. ते किती धोकादायक आहे हे तुम्ही यावरून समजू शकता. विशेष म्हणजे हे मालवेअर चिनी, जपानी, कोरियन, इंग्रजी, झेक, फ्रेंच, इटालियन, पोलिश आणि पोर्तुगीज यासारख्या अनेक भाषांमधील विशिष्ट कीवर्ड ओळखते.


सम्बन्धित सामग्री