Sunday, August 31, 2025 07:03:47 PM

Google Android Update: गुगलने घेतला मोठा निर्णय; 2026 पासून Android यूजर्ससाठी 'हे' अ‍ॅप्स बंद

Google ने आपल्या Android प्लॅटफॉर्मवर मोठा बदल जाहीर केला आहे.

google android update गुगलने घेतला मोठा निर्णय 2026 पासून android यूजर्ससाठी हे अ‍ॅप्स बंद

Google Android Update: Google ने आपल्या Android प्लॅटफॉर्मवर मोठा बदल जाहीर केला आहे. कंपनी आता फक्त वेरिफाईड आणि सर्टिफाईड डेवलपर्सच्या अ‍ॅप्सना Android डिव्हाइसवर इंस्टॉल करण्याची परवानगी देणार आहे. याचा अर्थ असा की, जे कोणतेही अनवेरिफाईड अ‍ॅप्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आता अडथळा येणार आहे. ही योजना मुख्यत्वे Android यूजर्सच्या सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसीसाठी राबवली जात आहे.

काय बदलणार आहे?

सध्याच्या काळात Android यूजर्स कोणत्याही सोर्सवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात, ज्यामुळे प्ले स्टोअरशिवायही अनेक अ‍ॅप्स वापरता येतात. परंतु 2026 पासून Google हे धोरण बदलणार आहे. कंपनी 'Developer Verification Program' सुरू करणार असून, यामध्ये प्रत्येक अ‍ॅप डेव्हलपरला वेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल. फक्त वेरिफाईड डेवलपर्सच्या अ‍ॅप्सना Android डिव्हाइसवर इंस्टॉल करण्याची परवानगी मिळणार आहे.

हेही वाचा: WhatsApp Wedding Card Scam: 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज, क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये

वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अ‍ॅप्स प्ले स्टोअरशिवाय थर्ड-पार्टी सोर्सेसवरही इंस्टॉल करता येतील, परंतु जे डेवलपर्स या प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत, त्यांचे अ‍ॅप्स वापरकर्त्यांना उपलब्ध होणार नाहीत. यामुळे Android यूजर्सला सुरक्षित आणि विश्वसनीय अ‍ॅप्सचा अनुभव मिळणार आहे.

कोणत्या डिव्हाइसेसवर लागू होणार?

ही योजना त्या सर्व Android डिव्हाइसवर लागू होईल जे Google सर्विसेससह प्री-इंस्टॉल्ड येतात. म्हणजे Google Play Services नसलेल्या फोन्सवर हा नियम लागू होणार नाही. Google या प्रक्रियेसाठी Developer Console तयार करत आहे, जिथे अ‍ॅप डेव्हलपर्स आपले वेरिफिकेशन करू शकतील.

टाइमलाइन

Google ने सांगितले की, ऑक्टोबर 2025 पासून या प्रणालीची टेस्टिंग सुरू होईल. डेवलपर्ससाठी Android Developer Console 2026 मार्चमध्ये सुरू होईल. 2026 च्या सप्टेंबरपासून हा प्रोग्राम सुरुवातीला ब्राझील, इंडोनेशिया, सिंगापूर आणि थायलंडमध्ये राबवला जाईल आणि 2027 पर्यंत संपूर्ण जगात लागू केला जाईल.

हेही वाचा:Apple Store in Pune: मुंबई-दिल्लीनंतर आता पुण्यात सुरू होणार अ‍ॅपलचे स्टोअर; कोणत्या सेवा उपलब्ध असतील? जाणून घ्या

बदलाचे फायदे

या नवीन धोरणामुळे Android यूजर्सना अनेक प्रकारच्या सायबर धोखाधडीपासून संरक्षण मिळेल. वेरिफाईड अ‍ॅप्समुळे डेटा चोरी, मालवेअर हल्ले आणि हॅकिंगच्या धोका कमी होईल. याशिवाय, अ‍ॅप डेव्हलपर्सना त्यांच्या अ‍ॅप्सची सुरक्षा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Google ने Android प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे Android यूजर्सना सुरक्षित अ‍ॅप्सचा अनुभव मिळेल आणि डेवलपर्सला त्यांच्या अ‍ॅप्सच्या गुणवत्ता सुधारण्याची संधी मिळेल. 2026 पासून हा बदल लागू होणार असल्यामुळे, सर्व Android यूजर्स आणि डेवलपर्ससाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री