विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसूत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवता येतील. भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील, त्यावेळी शहराचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल, असे विचार हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन आणि निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष आणि चीफ पॅट्रन डॉ. विजय गुपचूप यांनी व्यक्त केले. देशातील बांधकाम क्षेत्रातील पहिले अग्रणी निकमार विद्यापीठातर्फे आयोजित कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयांवरील दोन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.