व्हिस्की पिण्याचे शौकीन असलेल्या लोकांना बर्बन व्हिस्की संदर्भात माहिती असेल. भारताने बर्बन व्हिस्कीवरील कर 150 टक्क्यांवरून 100 टक्के कमी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशियाई बाजारपेठेत लावल्या जाणाऱ्या अन्याय्य शुल्कावर टीका केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी बोर्बन व्हिस्कीवरील सीमाशुल्कात 50 टक्के कपात जाहीर करण्यात आली.
अमेरिका बर्बन व्हिस्कीचा प्रमुख निर्यातदार -
सीमाशुल्क कपातीनंतर, बोर्बन व्हिस्कीवरील मुख्य सीमाशुल्क आता 50% असेल, ज्यामध्ये 50% अतिरिक्त कर आकारला जाईल, ज्यामुळे एकूण सीमाशुल्क 100% होईल. पूर्वी ते 150 टक्के होते. अमेरिका हा भारतात बर्बन व्हिस्कीचा प्रमुख निर्यातदार आहे. 2023-24 मध्ये भारताने 2.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची बर्बन व्हिस्की आयात केली.
हेही वाचा - चंद्रावर मोठा स्फोट होणार? 2024 YR4 लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर त्याचा एक तुकडा चंद्रावरही आदळणार
बर्बन व्हिस्की कशापासून बनवली जाते -
आता बर्बन व्हिस्कीवरील कर कमी करण्यात आला आहे. बोर्बन व्हिस्की ही अमेरिकेतील एकमेव स्वदेशी स्पिरिट आहे, जी कॉर्न, राई किंवा गहू आणि माल्टपासून बनवली जाते. या व्हिस्कीमध्ये किमान 51 टक्के कॉर्न असते. याशिवाय, त्यात कोणताही रंग किंवा चव घालता येत नाही. या व्हिस्कीमध्ये 80 ते 160 प्रूफ (अल्कोहोलची टक्केवारी) असते.
बोर्बन व्हिस्की बनवताना नवीन बॅरल वापरले जातात -
1800 च्या दशकात अमेरिकेतील केंटकी राज्यातील बोर्बन काउंटीमध्ये पहिल्यांदा बोर्बन व्हिस्की बनवण्यात आली. असे म्हटले जाते की, या व्हिस्कीचे नाव देशातील शहराच्या नावावरून ठेवले गेले आहे. बर्बन व्हिस्की करण्यासाठी कधीही न वापरलेले बॅरल वापरले जातात. शक्यतो इतर व्हिस्की बनवताना वापरलेले बॅरल पुन्हा वापरले जातात. परंतु, बर्बन व्हिस्की तयार करताना असं केलं जात नाही.
हेही वाचा - थायलंडमध्ये सापडली जगातील सर्वात उंच म्हैस; 6 फूट उंच म्हशीने नोंदवलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर, दोन्ही नेत्यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत पंतप्रधान मोदी हे एक महान नेते असल्याचे म्हटले आहे.