Asteroid 2024 YR4 May Collide With Moon
Edited Image
Moon Asteroid Collision: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने काही दिवसांपूर्वी भाकित केलं होतं की, 22 डिसेंबर 2032 रोजी 2024 YR4 हा लघुग्रह पृथ्वीवर आदळेल. परंतु, आता अॅरिझोना विद्यापीठातील कॅटालिना स्काय सर्व्हेचे ऑपरेशन्स इंजिनिअर डेव्हिड रँकिन यांनी एक पोस्ट लिहून इशारा दिला आहे की, लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 0.3 टक्के आहे, परंतु पृथ्वीवर आदळल्यानंतर, लघुग्रहाचा एक तुकडा चंद्रावरही आदळेल. जर ही टक्कर झाली तर चंद्रावर मोठा स्फोट होईल. याचा चंद्रावर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर 2 किलोमीटर रुंद खड्डा तयार होऊ शकतो.
लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठे नुकसान होईल?
तथापी, नासाच्या शास्त्रज्ञांनी असं भाकित केलं आहे की, जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो सुमारे 15 मेगाटन टीएनटी इतकी ऊर्जा निर्माण करेल, जी हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बने सोडलेल्या 8 मेगाटन उर्जेपेक्षा 500 पट जास्त आहे. तो हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा सुमारे 100 पट जास्त शक्तिशाली असेल. या स्फोटामुळे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी सारख्या महानगराचा नाश होऊ शकतो.
हेही वाचा - Viral Video : साप चावल्यावर किती विष सोडतो? नेटिझन्स म्हणाले, अरे बापरे.. मग काय वाचेल माणूस!
स्फोटस्थळापासून 19 किमी अंतरावर राहणाऱ्या लोकांना गमवावा लागेल जीव -
हा स्फोट ज्याठिकाणी होईल तेथून 19 किमी अंतरावर राहणाऱ्या लोकांना यात आपला जीव गमवावा लागू शकतो. जर 2024 वायआर4 एखाद्या मोठ्या शहराला धडकला तर त्याचे परिणाम विनाशकारी होतील. उदाहरणार्थ, यामुळे वेस्टमिन्स्टर ते क्रॉयडन पर्यंतचा लंडन परिसर नष्ट होऊ शकतो. या स्फोटामुळे मँचेस्टर, बेलफास्ट आणि एडिनबर्ग सारख्या इतर शहरांनाही नुकसान होऊ शकते. तथापी, हा स्फोट समुद्रात झाला, तर मोठा विनाश घडवू शकते.
हेही वाचा - आता AI Death Clock सांगणार तुमचा मृत्यू कधी होणार; काय आहे 'एआय डेथ क्लॉक'? जाणून घ्या
2024 YR4 लघूग्रह -
न्यू मेक्सिको इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी 27 जानेवारी 2025 रोजी हा लघुग्रह शोधला होता. शास्त्रज्ञांनी मॅग्डालेना रिज नावाच्या 2.4 मीटर लांबीच्या दुर्बिणीद्वारे या लघुग्रहाचे निरीक्षण केले. हा लघुग्रह फुटबॉलच्या मैदानाइतका मोठा आहे. हा लघुग्रह ताशी 38000 मैल वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. हा लघुग्रह 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता पृथ्वीच्या अगदी जवळ असेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
2024 YR4 लघूग्रह पृथ्वीसाठी धोकादायक -
दरम्यान, पृथ्वीजवळून तो सुरक्षितपणे जाण्याची शक्यता 97.9% असली तरी, नासाने तो पृथ्वीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. ते पूर्व प्रशांत महासागर, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, आफ्रिका, अरबी समुद्र आणि दक्षिण आशियातील कोणत्याही एका भागात धडकू शकते. या टक्करमुळे व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया, सुदान आणि नायजेरिया यासारख्या देशांमध्ये विनाश होऊ शकतो.