Viral Wedding Card: आताचा काळ हा लग्नसराईचा सुरु आहे गेल्यावर्षी तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अनेकांची लग्न पार पडली त्याचबरोबर यावर्षी सुद्धा जानेवारी फेब्रुवारीमद्धे लग्नाची मालिका सुरूच आहे. लग्न म्हंटल तर अक्षतांपासून ते वधू वराच्या कपड्यांपर्यंत कसं इतरांपेक्षा ट्रेंडी आणि वेगळं करता येईल असा हेतू सगळ्यांचा असतोच. लग्न आलं म्हणजे लग्नपत्रिका पण आली ती सुद्धा कशी अनोखी आकर्षित बनवता येईल हे आपण बघतो आणि त्यावर सुद्धा अफाट खर्च करतो. एवढंच नव्हे तर कधीकधी लग्नाच्या कार्डमध्ये नमूद केलेल्या गोष्टी देखील मनोरंजक बनतात.अशातच आता एका मुस्लिम कुटुंबाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. मुलाच्या कुटुंबाने हे लग्नपत्रिका त्यांच्या पाहुण्यांना वाटली. त्याने त्यात असे काहीतरी लिहिले होते की ते वाचल्यानंतर लोक लग्नाच्या वरातीत सामील व्हायलाच घाबरले.
फैक अतीक किदवई या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली. हे लग्न 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे त्याचबरोबर हे लग्न जयपूरमध्ये होत आहे. लग्नपत्रिकेतिल इतर मजकूर सारखाच आहे परंतु लोकांचे लक्ष आमद के 'मुंतज़िर' या वाक्याकडे जात आहे. मराठीमध्ये याचा अर्थ आगमनाची प्रतीक्षा करणारा असा होतो. आमद के 'मुंतज़िर' या अंतर्गत, पाहुण्यांच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या लोकांची नावे लिहिलेली असतात. या लोकांमध्ये बहुतेकदा कुटुंबातील मुलांची, वधू किंवा वराच्या काकांची नावे इत्यादींचा समावेश असतो. परंतु या लग्नपत्रिकेत अजबच चित्र पाहायला मिळतंय ज्यात मृत व्यक्तींची नावे नमूद केली गेली आहेत.
हेही वाचा :आईची मजबूरी की निर्दयता? शिर्डीतील घटनेमागील हृदयद्रावक सत्य

कार्डवर मृतांची नावे लिहिली आहेत.
या लग्नाच्या पत्रिकेत दर्शनास उत्सुक असलेल्या व्यक्तींमध्ये मृतांची नावे जोडण्यात आली आहेत. पत्रिकेत लिहिले आहे- स्वर्गीय नूरुल हक, स्वर्गीय लालू हक, स्वर्गीय बाबू हक, स्वर्गीय एजाज हक. यानंतर जिवंत लोकांची नावे लिहिली जातात. जयपूरमधील करबला मैदानावर हे लग्न होणार आहे. या कार्डमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीच्या कार्यक्रमांची माहिती आहे. काही भागांवर पांढरा रंग लावला आहे, ज्यामुळे ते वाचता येत नाहीत.
हेही वाचा :Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'
लग्नपत्रिकेवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
ही लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे. पत्रिकेला 600 हून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर 100 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले, "जोधपूर-जयपूरमधील लोकांमध्ये अश्या पत्रिका छापणे सामान्य आहे. एक पत्रिका नुकतीच आली आहे ज्यात, त्यात चार मृत व्यक्ती देखील दिसण्याची वाट पाहत आहेत.” असे म्हंटले आहे तर दुसरीकडे एकाने म्हटले, "मेजवानी करबलाच्या मैदानात आहे, म्हणून त्यांनी योग्य पत्रिका छापली आहे!"