Wednesday, August 13, 2025

प्रसिद्ध क्रिकेटरने माझ्यासोबत फ्लर्ट केलं असा दावा अभिनेत्री कशिश कपूरने केला

Editor Name: Jaimaharashtra News

अभिनेत्री तथा रियालिटी शो स्टार कशिश कपूरने एका मुलाखतीत मोठा दावा केला आहे.

एका प्रसिद्ध क्रिकेटरने कशिशसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ते तिला विचित्र वाटल्याचे तिने म्हटले आहे.

कशिशने सांगितले की, त्या क्रिकेटरने तिला भेटायला सांगितले. मात्र भेटण्याला तिने नकार दिला.

क्रिकेट हे फक्त एक प्रोफेशन आहे आणि त्यासाठी मी आकर्षित होत नाही, असे कशिशने मुलाखतीदरम्यान म्हटले.

कशिशने म्हटले, ते एक प्रसिद्ध क्रिकेटर होते आणि त्यांनी मला भेटण्यासाठी विचारलं, हे मला जरा वेगळं वाटलं. परंतु मी भेटण्यासाठी नकार दिला.

माझ्यासाठी तुम्ही फक्त एक क्रिकेटर आहात आणि मी प्रोफेशनमुळे आकर्षित होऊ शकत नाही, बरोबर आहे ना?

एक क्रिकेटर आहेत म्हणून मी त्यांना इम्प्रेस होईन, असे त्यांना वाटले. मात्र मला हे आवडत नाही.

तुम्ही क्रिकेटर आहात, हा तुमचा व्यवसाय आहे आणि मी त्यांचा सन्मान करते. परंतु तुम्ही माझ्यासोबत बॅट आणि बॉल खेळायला नाही येत आहात की, ज्यामुळे मी इम्प्रेस होऊ शकते.

कशिश कपूर रियालिटी शोमुळे प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे बिग बॉस 18 मध्ये तिची वाईल्ड कार्ड इंट्री झाली होती.