डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.
डाळिंबामध्ये लोह भरपूर असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे ऍनिमिया (रक्ताल्पता) दूर होतो.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असते. जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करते.
डाळिंबात फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते, आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते
डाळिंब खाल्ल्याने त्वचेला पोषण मिळते, त्वचा उजळ होते, आणि चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
डाळिंब खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे डायबेटीस रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते.