Thursday, March 27, 2025

विमानतळाजवळील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

Editor Name: Jaimaharashtra News

उन्हाळाजवळ आल्यावर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जाण्याचे नियोजन करतात. मात्र पर्यटक कुठे जातील याचा काही अंदाज सांगू शकत नाही.

जगभारत असे अनेक समुद्रकिनारे आहेत, जे विमानतळापासून खूप जवळ आहे. त्यामुळे या समुद्रकिनारी येऊन विमानाला जवळून पाहण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात.

चला तर सविस्तर जाणून घेऊया समुद्रकिनाऱ्यांपासून कोणकोणते विमानतळ जवळ आहेत.

1 - अल ममझार बीच पार्क, दुबई: अल ममझार बीच पार्क दुबईमध्ये असून हा समुद्रकिनारा दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. अनेक पर्यटक सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी खास या समुद्रकिनारी येतात.

2 - बांजे बीच, क्रोएशिया: बांजे बीच डबरोवनिक विमानतळापासून दहा मिनिटांच्या पायी अंतरावर आहे. या समुद्रकिनारी भव्य दृश्यांसोबतच, पर्यटकांना उत्तम जेवण आणि जल क्रीडांचा (Water Sports) आस्वाददेखील घेता येतो.

3 - लारा बीच, तुर्की: अंतल्या विमानतळापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर, लारा बीच हा तुर्कीतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. याठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात.