Sunday, August 31, 2025 02:51:08 PM

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला- भिंतींवर भारतविरोधी लिखाण, हिंदूंना परत जाण्याचा इशारा!

मेरिकेत गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. ट्रम्प सरकारनंतरही धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते.

अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला- भिंतींवर भारतविरोधी लिखाण हिंदूंना परत जाण्याचा इशारा

कॅलिफोर्निया अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एका प्रसिद्ध हिंदू मंदिरावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करून भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी घोषणा लिहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “हिंदूंनो परत जा” अशा आशयाचे संदेश मंदिराच्या भिंतींवर आढळून आले, ज्यामुळे हिंदू समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या तथाकथित ‘खलिस्तानी जनमत’च्या काही दिवस आधी घडली, त्यामुळे या घटनेला वेगळा राजकीय संदर्भ मिळत आहे. अमेरिकेत गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या घटना वाढताना दिसत आहेत. ट्रम्प सरकारनंतरही धार्मिक असहिष्णुता आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते.

हेही वाचा: गौरव आहुजाच्या माफीचा नवा नाट्यकल्लोळ – पुणेकरांनो, मला माफ करा!

हिंदू समाजाची प्रतिक्रिया
चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याने स्थानिक हिंदू समुदायामध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. बीएपीएस संस्थेनेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आपल्या अधिकृत एक्स  हँडलवरून स्पष्ट संदेश दिला की, “द्वेषाला येथे जागा नाही. आम्ही शांतता आणि करुणा टिकवून ठेवण्यासाठी काम करत राहू.”

अशा घटनांमुळे अमेरिकेतील हिंदू समाजाला स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न पडला आहे. धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याने केवळ मंदिरांचे नुकसान होत नाही, तर भावनिक आणि मानसिक स्तरावरही समुदाय प्रभावित होतो. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जात आहे.

 

'>http://

 


सम्बन्धित सामग्री




Live TV