China's Ban On Fertilizer Exports: चीनमधील भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-चीन संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत, तरी चीनने एक महत्त्वाची धोरणात्मक खेळी केली आहे. ऑक्टोबरपासून चीन विशेष खतांच्या निर्यातीवर पुन्हा बंदी घालणार असल्याची माहिती विद्राव्य खत उद्योग संघटनेच्या (SFIA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे भारतातील खत पुरवठ्यात अडथळे येऊ शकतात तसेच खतांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
सध्या चीनने काही काळासाठी खतांची निर्यात सुरू ठेवली आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु हा दिलासा दीर्घकाळ टिकणार नाही. पुढील महिन्यापासून निर्यात कडक करण्याचा निर्णय अमलात येईल, ज्यामुळे मालवाहतुकीत विलंब होऊ शकतो. SFIA चे अध्यक्ष राजीव चक्रवर्ती म्हणाले की, चीन एकदा निर्यात थांबवतो किंवा मर्यादित करतो, तर पूर्णपणे बंद करत नाही. तपासणी लादून आणि मालवाहतुकीत विलंब करून अडथळे आणले जातील. ही प्रक्रिया ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल, ज्याचा थेट परिणाम भारतातील खत उद्योगावर होणार आहे.
हेही वाचा - Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारताची पहिली हाय-स्पीड बुलेट ट्रेन; मुंबई ते अहमदाबाद 508 किमीचा प्रवास आता फक्त 3 तासांत
कंपन्यांची तयारी
भारतीय विशेष खत कंपन्या ऑक्टोबरपूर्वी शक्य तितके खत खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक बाजारपेठेतही खते मागवणाऱ्या कंपन्या दिवस-रात्र काम करत आहेत. देशात हंगामाच्या मध्यापर्यंत खते उत्पादन पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे काही प्रमाणात पुरवठा संतुलित होईल.
हेही वाचा - SCO Conference In China: 'दहशतवादावर दुहेरी निकष स्वीकारार्ह नाहीत...'; चीनमधील एससीओ परिषदेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य
शेतकऱ्यांवर परिणाम
राजीव चक्रवर्ती यांनी सांगितलं की, यावेळी फारसा परिणाम दिसणार नाही, फक्त किंमतवाढ होईल. याचा अर्थ, खतांच्या किमती वाढतील आणि शेतकऱ्यांवर थेट आर्थिक ताण येईल. भारत चीनकडून बरीच विशेष खते खरेदी करतो. 200 पासून चीनवरील अवलंबित्व अधिक वाढले आहे. युरोपियन पुरवठादारांव्यतिरिक्त आता चीनकडूनही खते खरेदी केली जातात, ज्यामुळे भारताच्या खत पुरवठ्याच्या धोरणावर चीनचा प्रभाव स्पष्ट दिसतो.