Once Donald Trump Asked Emma Thompson For A Date : ऑस्कर पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एमा थॉम्पसन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका चित्रपट महोत्सवात सहभागी झाल्या असता त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, माझा घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी मला डेटवर येण्यासाठी फोन केला होता. 66 वर्षीय ब्रिटिश अभिनेत्री थॉम्पसन यांनी या प्रसंगाची आठवण सांगताना गमतीत म्हटले, “जर तेव्हा होकार दिला असता तर आज मी अमेरिकन इतिहास बदलू शकले असते.” विशेष म्हणजे सेलिब्रिटी सलमा हायेकनेही अशाचप्रकारचा दावा काही दिवसांपूर्वीच केला होता.
स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये 66 वर्षीय एम्मा थॉम्पसन यांना त्यांच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल सन्मानित केले जात होते, तेव्हा त्यांनी सांगितले की, केनेथ ब्रानाघशी तिचे ब्रेकअप झाले, त्याच दिवशी आताचे अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना 'डेट'साठी त्यांच्यासोबत बाहेर येण्यास सांगितले होते. मात्र, एम्मा यांना कोणीतरी चेष्टा करत आहे, असे वाटल्यामुळे त्या गेल्या नाहीत.
फोन कॉलवर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
1998 च्या प्रायमरी कलर्स चित्रपटाच्या सेटवर असताना थॉम्पसन यांचा फोन वाजला आणि डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या बाजूला होते, असे या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीने सांगितले. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, "हॅलो, मी डोनाल्ड ट्रम्प आहे," असे पलीकडून सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
थॉम्पसन यांनी तेव्हा त्यांच्यादरम्यान काय बोलणे झाले होते, तेही सांगितले. "मला वाटलं की ही एक चेष्टा आहे आणि मी विचारलं, 'मी तुम्हाला कशी मदत करू शकते?' कदाचित त्यांना कोणाकडून तरी मार्गदर्शनाची गरज असेल," थॉम्पसन पुढे म्हणाल्या, "मग ते म्हणाले, 'मला आवडेल की तुम्ही या सुंदर ठिकाणी येऊन राहा. कदाचित आपण रात्रीचे जेवण सोबत करू शकतो.'"
यावर थॉम्पसन यांनी सांगितले की, 'खूप छान' असे त्या म्हणाल्या आणि त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. "मी तुमच्याशी नंतर बोलेन," असे म्हणून थॉम्पसन यांनी फोन ठेवला. अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलावलेले असतानाही कोणतरी मस्करी करत आहे असे वाटल्याने एम्मा थॉम्पसन या 'डेट'वर गेल्या नाहीत. थॉम्पसन पुढे म्हणाल्या की, मला नंतर कळले की, तो फोन खरोखरंच डोनाल्ड ट्रम्प यांचा होता.
हेही वाचा - Trump-Putin To Meet In Alaska : 58 वर्षांपूर्वीची रशियाची चूक, अलास्का अमेरिकेला विकला; इथेच ट्रम्प-पुतिन भेटतील
द टेलिग्राफनुसार, थॉम्पसन यांनी असे सांगितले की ट्रम्प, त्यावेळेस त्यांची दुसरी पत्नी - मार्ला मॅपल्स - यांच्याशी विभक्त झाले होते आणि त्यांचे कर्मचारी त्यांच्यासाठी 'योग्य' अशा व्यक्तीचा शोध घेत होते.
दरम्यान, यावर आणखी गंमत करताना थॉम्पसन म्हणाल्या की, जर त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले असते तर मग माझ्याकडे सांगण्यासाठी एक गोष्ट असती. शिवाय, मी अमेरिकेचा इतिहास बदलू शकले असते..! थॉम्पसन यांचे ग्रेग वाईजशी लग्न झाले आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. तर, ट्रम्पने मेलानियाशी लग्न केले.
सलमा हायेकलाही डेटसाठी विचारणा
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत असे सांगणाऱ्या थॉम्पसन या पहिलीच व्यक्ती नाहीत. यापूर्वी हॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटी सलमा हायेक यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता. सलमा हायेक म्हणाल्या होत्या की, माझा बॉयफ्रेंड असतानाही ट्रम्प यांनी मला डेटबाबत विचारणा केली होती. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर थॉम्पसन यांनीही ट्रम्प यांच्याबाबतची आठवण सांगितली.
हायेक त्यावेळी फारशा परिचित नव्हत्या आणि त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांच्या आयुष्याची माहिती ट्रम्प-नियंत्रित टॅब्लॉइड नॅशनल एन्क्वायररमध्ये गेली. याविषयी सांगताना हायेक म्हणाल्या, "जेव्हा मी त्याला (ट्रम्प यांना) सांगितले की, माझा बॉयफ्रेंड नसता तरी मी त्याच्यासोबत बाहेर जाणार नाही, (ही बाब ट्रम्प यांना अनादर वाटली), तेव्हा त्यांनी किंवा कोणीतरी नॅशनल एन्क्वायररला सांगितले," असे हायेक म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - ट्रम्पना धक्का? एकीकडे अमेरिकेच्या टॅरिफ धमक्या सुरूच; भारत या श्रीमंत देशासोबत करणार 10 मोठे करार