Tuesday, September 02, 2025 09:54:01 AM

World Record : हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा! ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम

मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलं आहे. विशेष बाब म्हणजे, हे शेती करणारं जोडपं आहे.

world record  हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम

World record for married life : प्रेम असेल तर कोणतंही नातं दीर्घकाळ टिकू शकतं.. मग कोणत्याही अडचणी आल्या तरी.. ब्राझीलच्या एका जोडप्याने हेच सिद्ध केले आहे. हे जोडपं म्हणजे शंभरी पार केलेले आजी-आजोबा आहेत. 105 वर्षांच्या मॅनोएल आजोबांनी 101 वर्षांच्या मारिया आजींचा हात प्रेमाने हातात धरत कॅमेऱ्याला अश्शी गोड पोझ दिलीय की अगदी पाहातच राहावं.. छोट्या-मोठ्या कुरबुरींवरून घर मोडायला निघालेल्या तरुण-तरुणींनी आणि त्यांच्या पालकांनी यातून शहाणपणाचा धडा घ्यायला हवा..

मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनलं आहे. ब्राझीलमधील या जोडप्याच्या लग्नाला 84 वर्षे 77 दिवस झाले असून हे जोडपे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे बनले आहे. विशेष बाब म्हणजे, हे शेती करणारं जोडपं आहे.

हेही वाचा - Viral Video : 'विश्वासच बसत नाही.. मी व्हेल माशाच्या तोंडात होतो' 23 वर्षांच्या तरुणाला व्हेल माशाने अख्खं गिळलं.. मग..

इतक्या वर्षांची भागीदारी यशस्वीपणे निभावणाऱ्या आजी-आजोबांनी आजही त्यांच्या नात्यातला प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवलाय. 'मी आणि माझं' यापलीकडे विचार न करणाऱ्या अमेरिकन संस्कृतीला ग्रेट मानणाऱ्यांना न बोलता उत्तर दिलंय.. कारण, इतकी वर्ष सोबत राहण्यासाठी एकमेकांचा आणि घरातल्या सर्वच लोकांचा विचार करावा लागतो. आता या आजी-आजोबांच्या नावे विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. मॅनोएल (105) आणि मारिया (101) या जोडप्याने वैवाहिक जीवनाचा सर्वात जास्त काळ एकमेकांसोबत घालवला आहे. त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

मॅनोएल आणि मारिया या दोघांची प्रेमकहाणी 1936 मध्ये सुरू झाली होती. हे दोघे 1936 मध्ये पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर 1940 मध्ये त्यांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली. तेव्हापासून ते आजतागायत दोघेही सुंदर आयुष्य जगत आहेत. मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो या जोडप्याला 13 मुले असून आज त्यांचा परिवार खूप मोठा आहे. त्यांच्या कुटुंबात 100 पेक्षा जास्त नातवंडे आहेत.

हेही वाचा - पाकिस्तानचं कामच जगावेगळं! 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी हे काय करून बसलेत, सगळीकडे चर्चेचा विषय

या ब्राझिलियन जोडप्यापूर्वी कॅनडाचे डेव्हिड जेकब हिलर आणि सारा डी हिलर हे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे होते. मॅनोएल अँजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो यांनी त्यांच्या संसाराला 1940 मध्ये सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला मारियाच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल शंका होती. पण मॅनोएलने तिचं मन जिंकण्यात यश मिळवलं. आता या जोडप्याचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. वृद्धापकाळात मॅनोएल आणि मारिया आपले जीवन शांततेत जगत आहेत.

दरम्यान, त्यांना सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य विचारलं असता त्यांनी ‘प्रेम’ असं उत्तर दिलं. अनेक दशकं या जोडप्याने त्यांच्या वाढत्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तंबाखूची लागवड करून शेतीत परिश्रमपूर्वक काम केल्याचं ते सांगतात. हे जोडपे सर्वात जास्त काळ जगणारे जोडपे बनले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.


सम्बन्धित सामग्री