राज ठाकरे त्यांच्या राजकीय आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले दिसून येतात. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक मजेशीर प्रसंग घडला. राज ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना अचानक त्यांच्या पाळीव कुत्रा त्याठिकाणी आला. त्याला पाहून उपस्थितांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
ए पिल्लू....इकडे ये ...वरती ये, अशी हाक राज ठाकरेंनी आपल्या कुत्र्याला मारली. राज ठाकरे यांना एका पत्रकाराने कुत्र्याचे नाव विचारले. तेव्हा राज ठाकरे यांना कुत्र्याचे नाव रायनो असल्याचे सांगितले.