Manoj Jarange Patil Azad Maidan: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. पण मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. मराठा आंदोलकांमुळे ऐन गणेशोत्सव काळात मुंबईला छावणीचे स्वरुप आले आहे. यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला अनेक निर्देश दिले आहेत. आझाद मैदानातच आंदोलक थांबावेत, इतर ठिकाणी फिरु नये म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी आणखी मोठा नवा मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे 50 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद इतका मंडप असून त्यात अडीच ते तीन हजार लोक थांबू शकतील इतका मोठा हा मंडप आहे. यामुळे इतर ठिकाणी पसरलेले आंदोलक मैदानातच येतील असा विश्वास जरांगेंचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : न्यायालयाच्या निर्णयानंतर छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा, म्हणाले, 'हा मूर्खपणा...'
न्यायालयाच्या निर्देशानंतर आज सकाळची परिस्थिती कशी?
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर मध्य रात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या उभ्या गाड्या पोलिसांनी काढायला सुरुवात केली. तसेच हा परिसर महापालिकेकडून स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी स्पीकरच्या मदतीने आणि प्रत्यक्ष भेटून वाहने मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगितली. जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची कालची चौथी रात्र होती. त्यात न्यायालयाने निर्देश दिले असले तरी आंदोलक मात्र या परिसरातून कमी झाले नाहीत. या चौथ्या रात्री देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
स्थानकावर मोठ्या संख्येने आंदोलक झोपले होते.