Tuesday, September 02, 2025 06:51:58 PM

AI Use Proved Fatal: ChatGPT वर आंधळा विश्वास ठरला घातक; सामान्य लक्षणांमागे निघाला प्राणघातक कर्करोग

वॉरेन काही काळापासून आजारी होते. त्यांना खाण्यापिण्यात अडचण, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवत होती. डॉक्टरांकडे न जाता त्यांनी त्यांची लक्षणे ChatGPT ला सांगितली.

ai use proved fatal chatgpt वर आंधळा विश्वास ठरला घातक सामान्य लक्षणांमागे निघाला प्राणघातक कर्करोग

AI Use Proved Fatal: आयर्लंडमधील 37 वर्षीय वॉरेन टियरनी यांच्यासाठी एआयवर ठेवलेला विश्वास महागात पडला. वॉरेन काही काळापासून आजारी होते. त्यांना खाण्यापिण्यात अडचण, अशक्तपणा आणि अस्वस्थता जाणवत होती. डॉक्टरांकडे न जाता त्यांनी त्यांची लक्षणे ChatGPT ला सांगितली. एआयने त्यांना खात्री दिली की ही लक्षणे कर्करोगाशी संबंधित नाहीत. मात्र, काही आठवड्यांनंतर वॉरेनची प्रकृती आणखी बिघडली. शेवटी जेव्हा ते रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना अन्ननलिकेचा स्टेज-4 एडेनोकार्सिनोमा (Esophageal Adenocarcinoma) असल्याचे निदान केले. हा घसा आणि अन्ननलिकेशी संबंधित गंभीर कर्करोग असून, यामध्ये 5 वर्षे जगण्याची शक्यता केवळ 5-10 टक्के असते.

ChatGPT वर विश्वास ठेवणे ठरले मोठी चूक

वॉरेन यांनी सांगितले की, 'ChatGPT वर विश्वास ठेवणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. एआय अनेकदा असे उत्तर देते जे तुम्हाला ऐकायला आवडेल, जेणेकरून तुम्ही त्याच्याशी जोडलेले राहाल. यामुळे माझे दोन महिने वाया गेले आणि माझी प्रकृती गंभीर झाली.' 

हेही वाचा - Dangerous AI Advice: 'आमच्या मुलाच्या मृत्यूसाठी ChatGPT जबाबदार...'; पालकांनी OpenAI आणि CEO सॅम ऑल्टमनवर दाखल केला खटला

ChatGPT चे स्पष्टीकरण

या घटनेवर प्रतिक्रिया देताना ChatGPT च्या निर्मात्या कंपनीने स्पष्ट केले की, हे सॉफ्टवेअर वैद्यकीय निदान किंवा उपचारासाठी डिझाइन केलेले नाही. ते फक्त माहिती सामायिक करण्याचे साधन आहे, परंतु ते व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही.

हेही वाचा - Flesh-eating Screwworm Parasite: धक्कादायक! जिवंत माणसांना खातो 'हा' किडा; मेक्सिकोमध्ये आढळले 5 हजार रुग्ण

डॉक्टरांवर विश्वास ठेवा, एआयवर नाही 

वॉरेन आता लोकांना आवाहन करत आहेत की, आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येवर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलं की, तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी, आरोग्य आणि जीवनाशी संबंधित बाबतीत एआयवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. या प्रकरणाने स्पष्ट केले आहे की एआयचा वापर माहिती मिळवण्यासाठी करता येईल, पण आरोग्याचे निर्णय घेण्यासाठी फक्त डॉक्टरच अंतिम आणि सुरक्षित पर्याय आहेत.


सम्बन्धित सामग्री