Samsung Galaxy A Series : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी ए (Galaxy A) सीरीजचे 10 कोटी स्मार्टफोन्स भारतात डिसेंबरपर्यंत विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा टप्पा पूर्ण केला जाईल, अशी कंपनीला आशा आहे. Galaxy A17 5G सह या सीरीजमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे. या सीरीजपासून वापरकर्त्यांना एआय फीचर्सचा (AI Features In Samsung Galaxy A17) लाभ देण्यात येत आहे. यामुळे विक्रीला गती देईल, असा अंदाज कंपनीला आहे.
सॅमसंग इंडिया (एमएक्स बिझनेस) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी सोमवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये लाँच झाल्यापासून कंपनीने जून 2025 पर्यंत गॅलेक्सी ए मालिकेचे 9.6 कोटी युनिट्स विकले आहेत. "गॅलेक्सी ए17 5जी हा 'ए' मालिकेतील सर्वात परवडणारा एआय स्मार्टफोन (AI Smartphone) असेल. सॅमसंगच्या उत्पादनांच्या संग्रहातील स्मार्टफोनचा हा सर्वात मोठा पोर्टफोलिओ आहे. वर्षाच्या अखेरीस भारतात ए मालिकेचा 10 कोटी युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.
हेही वाचा - AI Security: चोरांना धडा शिकवण्यासाठी AI-पावर्ड iRobo भारतात; स्मार्ट कॅमेरे आणि सेंसरसह 24 तास मॉनिटरिंग
सॅमसंगने गुगलसोबत भागीदारी करून "सर्कल टू सर्च" (Circle to Search) आणि जेमिनी लाईव्ह (Gemini Live) सारखी एआय वैशिष्ट्ये (AI Features) सादर केली आहेत. ज्यामुळे गॅलेक्सी वापरकर्त्यांना (Samsung Galaxy Users) एआयद्वारे समर्थित रिअल-टाइम व्हिज्युअल संवाद (Real Time visual Communication) साधता येत आहेत.
हा स्मार्टफोन 18,999 ते 23,499 रुपयांच्या किमतींदरम्यान उपलब्ध असेल. या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून त्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आहे, ज्याला नो-शेक कॅम (No Shake Cam) म्हणून ओळखले जाते, एक्सिनोस 1330 प्रोसेसर (Exynos 1330 processor) आणि 5000 mAh बॅटरी आहे.
पुल्लन म्हणाले की, आगामी सणासुदीच्या हंगामात कंपनीच्या वार्षिक व्यवसायात जवळपास 22 ते 25 टक्के वाटा असण्याची अपेक्षा आहे. "येणारा 30 ते 45 दिवसांचा सणासुदीचा हंगाम महत्त्वाचा असेल," असे ते म्हणाले. कंपनीला गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात नोंदवलेल्या विक्रीच्या तुलनेत तिच्या प्रमुख फोल्ड सिरीज आणि एस सिरीज स्मार्टफोनमध्ये दुहेरी अंकातील वाढ अपेक्षित आहे, असे पुल्लन म्हणाले.
हेही वाचा - Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखाली Reliance Intelligence लाँच; भारतातील व्यवसाय आणि सरकारी संस्थांसाठी AI सुविधा विस्तारित