सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Samsung Electronics Co-Ceo Han Jong-Hee Dies) हान जोंग-ही (Han Jong-Hee) यांचे 25 मार्च 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने याची पुष्टी केली आहे.
कंपनीमध्ये हान जोंग-ही यांचे योगदान:
हान जोंग-ही हे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन सह-मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एक होते. ते कंपनीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल उपकरण विभागाचे प्रमुख होते. इतर सह-मुख्य कार्यकारी अधिकारी जुन यंग-ह्यून सोबत, हान जोंग-ही कंपनीचे उत्तम ऑपरेशन्ससाठी नेतृत्व करत होते. सॅमसंगला टेलिव्हिजन उद्योगात सर्वोत्कृष्ट बनवण्याचे श्रेयदेखील त्यांना दिले जाते.
प्रतिस्पर्धकांना केले पराभूत:
हान जोंग-ही यांनी त्यांच्या क्षेत्रात सोनी ग्रुप कॉर्पसारख्या जपानी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. इतकंच नाही तर ॲपल (Apple) सारख्या बलाढ्य स्पर्धकाच्या विरोधात बाजारपेठेत आपलं मजबूत स्थान निर्माण करून, त्यांनी सॅमसंगच्या मोबाईल डिव्हाईस सेगमेंटलाही बळकटी दिली.
हान जोंग-ही कंपनीच्या बोर्डाचे सदस्यदेखील होते. 2022 मध्ये त्यांना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आले.
बाजाराच्या विस्तारात त्यांनी दिलेले महत्त्वाचे योगदान:
हान जोंग-ही यांनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सला तंत्रज्ञानातील नवीन कल्पना आणि बाजारपेठेच्या विस्तारासाठी पुढाकार करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.
त्यांनी मागितली होती भागधारकांची माफी:
मागील आठवड्यातच, कंपनीच्या भागधारकांत्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाने सॅमसंगला ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठेवले.च्या बैठकीमध्ये हान जोंग-ही यांनी 2025 हे वर्ष आव्हानात्मक वर्ष म्हणून वर्णन केले होते. यासोबतच कंपनीच्या समभागांच्या कमकुवत कामगिरीबद्दलही त्यांनी भागधारकांची माफी मागितली होती.
त्यांनी सांगितले होते, '2025 हे वर्ष आव्हानात्मक असू शकते. परंतु, कंपनीच्या वाढीसाठी विलीनीकरण आणि अधिग्रहण धोरणांवर काम करत आहे. सॅमसंगच्या नवीन होम अप्लायन्सेसच्या लॉन्च इव्हेंटला हान जोंग-ही उपस्थित राहणार होते.
कोण होते हान जोंग-ही?
हान जोंग-ही यांचा जन्म 1962 साली झाला होता. हान जोंग-ही यांनी जवळपास 4 दशके सॅमसंगसोबत काम केले होते. डिस्प्ले डिव्हिजनने करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत यशाच्या अनेक शिखरांना स्पर्श केला.
2023 व्या वर्षांत त्यांना सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Samsung Electronics Co-Ceo) बनवण्यात आले. याआधीही त्यांनी डिस्प्ले विभाग आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या नेतृत्वासह कंपनीत अनेक वरिष्ठ पदांवर काम केले आहे.