Tuesday, September 02, 2025 06:50:46 PM

Fact Check: ATM मधून 500 रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत? व्हायरल बातम्यांवर सरकारने दिले स्पष्टीकरण

या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद होणार आहे.

fact check atm मधून 500 रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत व्हायरल बातम्यांवर सरकारने दिले स्पष्टीकरण

Fact Check: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2025 पासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा देणे बंद होणार आहे. इतकेच नाही, तर सप्टेंबरपर्यंत 75% एटीएम आणि मार्च 2026 पर्यंत 90% एटीएम फक्त 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच देतील. या दाव्यामुळे लोकांमध्ये मोठा गोंधळ पसरला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकचे स्पष्टीकरण

सरकारी माहिती संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या व्हायरल मेसेजची सत्यता स्पष्ट केली आहे. आरबीआयने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. 500 रुपयांची नोट कायदेशीर आहे आणि पुढेही राहणार आहे. एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांसोबत 500 रुपयांच्या नोटाही उपलब्ध राहतील, असे पीआयबीने स्पष्ट केले.

हेही वाचा - AI Security: चोरांना धडा शिकवण्यासाठी AI-पावर्ड iRobo भारतात; स्मार्ट कॅमेरे आणि सेंसरसह 24 तास मॉनिटरिंग

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले की, कोणत्या मूल्य श्रेणीतील किती नोटा छापायच्या हे सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्रितपणे ठरवतात. देशाच्या आर्थिक व्यवहाराच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातो. सध्या 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - WhatsApp AI Feature: WhatsApp ने लाँच केले 'हे' नवीन फीचर; चुका टाळा आणि मेसेजिंग करा स्मार्ट

अफवांपासून सावध रहा

पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती खरी की खोटी हे जाणून घेण्यासाठी नेहमीच अधिकृत वेबसाइट किंवा प्रेस रिलीज तपासा. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन आहेत आणि पुढेही तशाच राहतील. 30 सप्टेंबरपासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.


सम्बन्धित सामग्री