Tuesday, September 02, 2025 03:56:57 PM

Manoj Jarange Patil : आझाद मैदान सोडा! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय ठरणार?

manoj jarange patil  आझाद मैदान सोडा मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय ठरणार

मुंबई : मुंबईतील मराठा आंदोलकांना आज, २ सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. दरम्यान, मुंबईत पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. 

हेही वाचा : Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आंदोलकांना इतर भागातून बाहेर काढा; न्यायालयाच्या निर्देशानंतर काय घडले?

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावत आझाद मैदान खाली करण्यासंबंधीचं पत्र दिलं आहे.


सम्बन्धित सामग्री