K Kavitha Suspended From BRS: तेलंगणाच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी स्वतःच्या मुली व विधान परिषद सदस्य (MLC) के. कविता यांना पक्षातून निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेले गंभीर आरोप यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - PM Narendra Modi : हा देशातील सर्व माता-बहिणींचा अपमान; पंतप्रधान मोदींनी साधला विरोधकांवर निशाणा
बीआरएसने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कविता यांच्या अलीकडील वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याने पक्षाध्यक्ष केसीआर यांनी हा निर्णय घेतला. अलीकडील पत्रकार परिषदेत के. कविता यांनी कालेश्वरम प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणात थेट केसीआर यांच्या पुतण्यांचा म्हणजेच माजी अर्थमंत्री हरीश राव, खासदार संतोष कुमार आणि उद्योगपती मेघा कृष्णा राव यांचा उल्लेख करत त्यांच्यावर आरोप केले. त्यांनी केसीआर यांचे नाव या प्रकरणात ओढले असल्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले.
हेही वाचा - PM Narendta Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या मेड इन इंडिया चिपचं उद्घाटन
कालेश्वरम प्रकल्प वाद -
दरम्यान, तेलंगणातील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने कालेश्वरम प्रकल्पातील आर्थिक अनियमिततांची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. न्यायमूर्ती पीसी घोष आयोगाच्या अहवालानुसार, प्रकल्पात गंभीर त्रुटी आणि भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करण्यात आले असून, जवळपास एक लाख कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप आहे. के. कविता यांच्या निलंबनाने तेलंगणाच्या राजकारणात नवे समीकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.