Tuesday, September 02, 2025 06:48:50 PM

IndiGo Flight Return : मोठा अपघात टळला! पक्षी धडकल्याने नागपूर-कोलकाता इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.

indigo flight return  मोठा अपघात टळला पक्षी धडकल्याने नागपूर-कोलकाता इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग

IndiGo Flight Returns After Bird Strike: नागपूरहून कोलकाताला जाणाऱ्या इंडिगोच्या 6ई812 या विमानाला उड्डाणानंतर हवेत पक्षी धडकला. त्यानंतर विमान पुन्हा नागपूर विमानतळावर परतले. 272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.

नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी सांगितले की, 'काय घडले याचे विश्लेषण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.' विमानातील प्रवाशांमध्ये सुहदकर कोहळे, शेखर भोयर आणि नितीन कुंभलकर यांसारख्या प्रमुख व्यक्तीही होत्या. घटनेनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

हेही वाचा - Weather Update : या सहा राज्यांना पावसाचा रेड अलर्ट; कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पावसाची शक्यता, जाणून घ्या दिल्ली ते मुंबई हवामानाची स्थिती

पक्षी धडकल्याने विमानाच्या पुढील भागाला नुकसान झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. न्यूज18 ने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाच्या समोरील भागावर स्पष्टपणे डेंट आणि क्रॅक दिसून आले आहेत. इंडिगो व नागपूर विमानतळ प्राधिकरण या घटनेची चौकशी करत असून, विमानाची तांत्रिक तपासणीही सुरू आहे.

हेही  वाचा - Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आंदोलकांना इतर भागातून बाहेर काढा; न्यायालयाच्या निर्देशानंतर काय घडले?

याचदरम्यान, सोमवारीच आणखी एका विमान कंपनीला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. पुण्याहून दिल्लीकडे निघालेल्या स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते हवेत असतानाच परत पुणे विमानतळावर आणावे लागले. विमानाने पूर्णपणे आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित लँडिंग केले. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना विमानातून व्यवस्थित उतरवण्यात आले, अशी माहिती स्पाइसजेटने निवेदनाद्वारे दिली.

या दोन घटनांमुळे विमानप्रवासादरम्यानच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने दुरुस्ती व चौकशी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवासी सुखरूप असल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी या घटना नागरी उड्डाण सुरक्षेसाठी गंभीर इशारा मानल्या जात आहेत.


सम्बन्धित सामग्री