Tuesday, September 02, 2025 10:32:40 PM

High Court on Manoj Jarange Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण आंदोलनाबाबतची सुनावणी 3 सप्टेंबरला ; हायकोर्ट काय म्हणालं ?

यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र...

high court on manoj jarange maratha reservation protest  मराठा आरक्षण आंदोलनाबाबतची सुनावणी 3 सप्टेंबरला  हायकोर्ट काय म्हणालं

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. दरम्याने  यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र, या नियमाचे उल्लंघन झाले, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 

काल म्हणजे 1 सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी पार पडली होती. या सुनावणीमध्ये न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत आझाद मैदानाचा परिसर खाली झाला पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांवर ताशेरे ओढले. आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ 24 तासांची परवानगी दिली होती. मग तुम्ही तिथे अजून का थांबला आहात?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. 

हेही वाचा - K Kavitha Suspended From BRS: वडिलांच्या पक्षातून के. कविता निलंबित; चंद्रशेखर राव यांनी का घेतला इतका कठोर निर्णय? 

त्यानंतर मनोज जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडून उद्यापर्यंतचा वेळ मागण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर दुपारी 1 पर्यंत तहकूब केली आहे.

हेही वाचा - Manoj Jarange Patil Maratha Protest : 'मेलो तरी हटणार नाही, काय व्हायचंय ते होऊ दे'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा 


सम्बन्धित सामग्री