Sunday, August 31, 2025 08:17:21 PM

हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजावर घडवून आणला स्फोट! टायटॅनिकसारखे बुडाले जहाज

प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला.

हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजावर घडवून आणला स्फोट  टायटॅनिकसारखे बुडाले जहाज
Explosion On Cargo Ship

Explosion On Cargo Ship: येमेनमधील हुथी बंडखोर लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर सातत्याने हल्ले करत आहेत. अलिकडच्या काळात हे हल्ले वाढले आहेत. दरम्यान, हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की रविवारी त्यांनी लक्ष्य केलेले मालवाहू जहाज लाल समुद्रात पूर्णपणे बुडाले आहे. समुद्रात बुडालेल्या जहाजाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. प्रथम हुथी सैनिकांनी जहाजावर चढून ते ताब्यात घेतले आणि नंतर जहाजात स्फोट घडवून आणले. स्फोटानंतर जेव्हा जहाज समुद्रात बुडू लागले तेव्हा त्याचा व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून रेकॉर्ड करण्यात आला. हुथींनी हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा - किळसवाणा प्रकार! डिलिव्हरीपूर्वी दूध विक्रेता कॅनमध्ये थुंकला; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजवर केला स्फोट - 

हुथी बंडखोरांनी रविवारी लायबेरियाच्या ध्वजांकित ग्रीक जहाज 'मॅजिक सीज' वर ड्रोन, क्षेपणास्त्रे, रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि लहान शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर, जहाजातील 22 क्रू मेंबर्सना जहाज सोडावे लागले. व्हिडिओमध्ये, जहाज बुडण्यापूर्वी त्यात मोठे स्फोट झाल्याचे दिसून येते. सोमवारी दुपारी 'मॅजिक सीज' वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हुथी बंडखोरांनी घेतली आहे. 

हेही वाचा - चक्क पाण्याच्या विहिरीत लागली आग.. रहस्य उलगडले तेव्हा संपूर्ण देशाचे नशीब पालटले!

मालवाहू जहाजावर स्फोट, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, हौथींच्या हल्ल्यांनंतर इस्रायली सैन्याने सांगितले की, 'मॅजिक सीज'वरील हल्ल्यानंतर, त्यांनी हुदेइदा, रास इसा आणि सलिफमधील हुथी बंडखोरांनी व्यापलेल्या बंदरांना तसेच रास कनातिब पॉवर प्लांटला लक्ष्य केले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2025 दरम्यान, हौथींनी 100 हून अधिक व्यापारी जहाजांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले आहे. यापैकी अनेक जहाजे समुद्रात बुडाली आहेत. यात अनेक क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला होता. 
 


सम्बन्धित सामग्री