दरवर्षी, जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून तुम्ही विमान अपघाताच्या बातम्या ऐकलाच असाल. पण आज आपण अशा एका विमान अपघाताच्या घटनेबद्दल उलघडा करणार आहोत, ज्यामध्ये तब्बल 72 दिवसानंतर प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. ज्याठिकाणी हा अपघात झाला होता, ते ठिकाण बर्फाच्छादित होते. त्यामुळे अन्नाचा तुटवडा होता. अशातच, अन्नाअभावी अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. इतकंच नाही, तर वाचलेल्या काही प्रवाश्यांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या काही प्रवाशांचे मांसही खाल्ले. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हा सर्व प्रकार नेमकं घडला तरी कसा? अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे माणसाला माणसाचे मांस खावे लागले? जाणून घेऊया सविस्तर.
13 ऑक्टोबर 1972 रोजी, उरुग्वेयन एअर फोर्स फ्लाइट 571 (Uruguayan Air Force Flight 571) हे विमान उड्डाण घेत होते. यामध्ये, उरुग्वेच्या ओल्ड ख्रिश्चन क्लबचा रग्बी संघ (rugby team) बळी ठरला. हा संघ चिलीतील (Chile) सँटियागो (Santiago) येथे सामना खेळणार होता. हे विमान संघाचे खेळाडू आणि व्यवस्थापकांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत अँडीज पर्वतावरून (Andes Mountains) जात होते.
'या' कारणामुळे विमान कोसळला होता:
उड्डाणानंतर, थोड्याच वेळात हवामान खराब होऊ लागले. पायलटला अँडीजच्या (Andes Mountains) पांढऱ्या बर्फाळ पर्वतांमध्ये काहीही दिसेनासे झाले. ज्यामुळे, विमानाचा अपघात झाला आणि ते बर्फाच्छादित डोंगरांमध्ये कोसळले. या अपघातानंतर अनेक प्रवासी जागेवरच ठार झाले. तर काहींना गंभीर दुखापती झाल्या.
बचावासाठी संघर्ष:
अपघातानंतर, जिवंत असलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी प्रतीक्षादेखील केली होती. परंतु, प्रचंड बर्फ आणि प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. काही दिवसानंतर त्यांना कळाले की अधिकाऱ्यांनी शोधमोहीम थांबवली आहे आणि आता त्यांना स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी उपाय शोधावे लागतील.
अन्नाअभावी खावे लागले मनुष्याचे मांस:
पहिल्या काही दिवसात प्रवाश्यांनी जिवंत राहण्यासाठी विमानात असलेल्या लहानशा अन्नसाठ्यावर जगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुरेसे नव्हते. त्यासोबतच, बर्फाच्छादित पर्वतरांगेमध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्य उरले नव्हते. अन्नाशिवाय जगण्याचा कोणताही मार्ग दिसेनासे झाल्यामुळे प्रवाश्यांनी नाइलाजास्तव मृत सहप्रवाशांचे मांस खाण्यास सुरुवात केले.
मानसिक आणि नैतिक संघर्ष:
हा निर्णय घेण्यामागे वाचलेल्या प्रवाश्यांची कोणतीही क्रूरता नसून शेवटचा पर्याय होता. एकीकडे भूक तर दुसरीकडे त्यांची जगण्याची इच्छा. यामुळेच जीवित प्रवाश्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. सुरुवातीला, अनेकांनी मृत मनुष्याचे मांस खाण्यास नकार दिला, पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती ज्यामुळे त्यांना ही टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्यांनी प्रार्थना करून मृत मनुष्याचे मांस खाण्यास सुरुवात केली.
वाचलेल्या प्रवाशांचा संघर्षमय प्रवास आणि मदत:
वाचलेल्या काही प्रवाश्यांनी मदतीच्या शोधात बाहेर पडले. दीर्घकाळ चालत गेल्यानंतर, दोन प्रवासी नॅन्डो पॅराडो (Nando Parrado) आणि रॉबर्टो कॅनेसा (Roberto Canessa) 70 किलोमीटर चालून एका गावाजवळ पोहोचले आणि त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. अखेर 72 दिवसांनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि 16 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले.