Wednesday, August 20, 2025 10:40:47 AM

Champions Trophy Final 2025: IND vs NZ CT 2025 फायनल बद्दल तुम्हाला माहित आहे?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

champions trophy final 2025 ind vs nz ct 2025 फायनल बद्दल तुम्हाला माहित आहे

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये (Champions Trophy Final 2025) भिडण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची टीम सज्ज आहेत. सर्वजण हा मॅच पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. हा मॅच रोमांचकारी होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे भारत आणि न्यूझीलंडची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये असून दोन्ही टीम प्रचंड मेहनतीने सराव करत आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत सर्व सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी टीम इंडियाने प्रचंड मेहनत घेतली आहे. सध्या दोन्ही टीम्स आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने सर्व प्रकारचे गट सामने जिंकून दाखवले आहेत. 2023 च्या इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये झालेल्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवून नवा इतिहास रचला आहे. एकीकडे न्यूझीलंडची टीम आयसीसी स्पर्धांमध्ये एक मजबूत बाजू म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यन्त सातत्याने त्यांनी आपली चमक आणि उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक फायनल गाठल्या आहेत. पण आयसीसीचे मोठे विजेतेपद मिळवण्यात ते कमी पडले आहेत. मात्र यंदा ते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा: ODI World Cup 2025: रोहित शर्माने रचला इतिहास. जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम तारीख:

 भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतीक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची अंतिम लढत 9 मार्च 2025 रोजी दुबईतील प्रतिष्ठित दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.


चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सुरू होण्याची वेळ:

नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होईल आणि सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल.


टीम इंडिया:

 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

हेही वाचा: Mohammed Shami: रोजा दरम्यान मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे वाद! जाणून घ्या


टीम न्यूझीलंड:

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’रर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 


चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे थेट प्रक्षेपण:

IND vs NZ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे थेट प्रक्षेपण तुम्ही JioCinema आणि Hotstar ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकता. त्यासोबतच तम्ही Star Sports देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता. 


सम्बन्धित सामग्री