नवी दिल्ली: देशातील सर्वात महागड्या शाळांचा विचार केला तर, मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मसूरीतील वुडस्टॉक स्कूल, देहरादूनमधील द दून स्कूल, इत्यादी. शाळा आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तुम्हाला माहित आहे? जगातील सर्वात महागडी शाळा कोणती आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा
जगातील सर्वात महागडी शाळा स्वित्झर्लंडमधील रोले शहरात आहे, ज्याचे नाव आहे इन्स्टिट्यूट ले रोझी (Institut Le Rosey). 1880 मध्ये पॉल-एमिल कॉर्नेल यांनी 'इन्स्टिट्यूट ले रोझी' या शाळेची स्थापना केली होती. विशेष म्हणजे, या शाळेची फी तब्बल 1 कोटी 13 लाख 73 हजार 789 रुपये इतकी आहे. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या फीमध्ये विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था समाविष्ट आहे. तसेच, अभ्यास, संगीत, घोडेस्वारी यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
या देशात सुमारे 60 देशांतील सुमारे 450 विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इन्स्टिट्यूट ले रोझी या शाळेने जवळपास 120 शिक्षकांची नियुक्ती केले आहेत. शाळेच्या इतिहासामुळे आणि प्रतिष्ठेमुळे, इन्स्टिट्यूट ले रोझीमध्ये अनेक राज्ये आणि शांच्या राजघराण्यातील मुले शिक्षण घेतात. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वर्ग, आवश्यक सुविधांनी युक्त असलेले एक मोठे मैदान, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या शाळेत काही ठराविक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो, ज्यामुळे शिक्षणाचा स्तर खूप उच्च राहतो.
'या' आहेत भारतातील सर्वात महागड्या शाळा
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल - मुंबई
वुडस्टॉक स्कूल - मसूरी
द दून स्कूल - देहरादून
गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल - ऊटी
सिंधिया स्कूल - ग्वालियर