Russia Attack on Kyiv: रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात कीवमधील 12 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या राजधानीत मध्यवर्ती भागात रशियाने गुरुवारी केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण ठार, तर 48 जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने ही माहिती दिली. युक्रेनवर रशियाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हवाई हल्ला होता. रशिया-युक्रेन युद्ध थांबावे, यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराखाली प्रयत्न केले जात आहेत.
Pakistan Debt : आधीच कर्जाचा डोंगर त्यात अजून भर ! पाकिस्तानने पुन्हा केली 7 अब्ज डॉलरची मागणी, कारण...
रशियाने केलेल्या हल्ल्यात कीव्हमधील इमारतींचे नुकसान
अमेरिकेच्या पुढाराखाली रशिया-युक्रेन युद्ध थांबावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते सुरू असताना रशियाने युक्रेनवर गेल्या काही आठवड्यांमधील मोठा हल्ला केला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने 598 ड्रोन आणि 31 वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली. रशियाने केलेल्या हल्ल्यात कीव्हमधील जवळपास 100 इमारतींचे नुकसान झाले. युक्रेनने रशियाची 563 ड्रोन आणि 26 क्षेपणास्त्रांना पाडल्याचे हवाई दलाने सांगितले. रशियाने आतापर्यंत केलेला हा सर्वांत मोठा हवाई हल्ला मानला जातो. मृतांमध्ये 2, 14 आणि 17 वर्षांच्या तीन मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू आहे.
युक्रेनने रशियातील दोन रिफायनरींना केले लक्ष्य
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की युक्रेनने डागलेली 102 ड्रोन रशियाने पाडली आहेत. युक्रेनचे ड्रोन रशियामधील तेल रिफायनरींना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियातील दोन रिफायनरींना लक्ष्य केले. काही ठिकाणांहून धूर येताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले.