Russia Drone Attack On Ukraine: रशियाने शनिवारी युक्रेनवर 619 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये 579 ड्रोन, 8 बॅलिस्टिक आणि 32 क्रूझ क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. युक्रेनियन हवाई दलाने 552 ड्रोन, 2 बॅलिस्टिक आणि 29 क्रूझ क्षेपणास्त्रे निष्क्रिय केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, हे हल्ले निप्रोपेट्रोव्हस्क, मायकोलाईव्ह, चेर्निहिव्ह, झापोरिझिया, पोल्टावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खार्किव्ह या 9 प्रदेशांमध्ये झाले. पायाभूत सुविधा, निवासी क्षेत्रे आणि खाजगी संस्था यांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांमध्ये 3 जण ठार आणि 26 हून अधिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा - Europe Airport Cyber Attack : यूके-बेल्जियमसह अनेक देशांमध्ये विमानतळ यंत्रणा ठप्प, हजारो प्रवासी अडकले
निप्रोपेट्रोव्हस्क ओब्लास्टचे गव्हर्नर सेर्ही लिसाक यांनी सांगितले की, शहरातील अनेक घरांवर आणि उंच इमारतींवर क्षेपणास्त्रांनी गंभीर नुकसान केले आहे. झेलेन्स्की यांनी म्हटले की, हे हल्ले नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा रशियाचा प्रयत्न आहेत. त्यांनी पुढील आठवड्यात न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मानवतावादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली.
हेही वाचा - H-1B Visa: '24 तासांच्या आत अमेरिकेत परत या...' मायक्रोसॉफ्टचा भारतीय कर्मचाऱ्यांना इशारा
दरम्यान, रशियाने एस्टोनियन हवाई क्षेत्राचे उल्लंघन नाकारले असून, एस्टोनियाने निषेध म्हणून रशियन राजदूतांना बोलावले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या लढाऊ विमानांनी कोणतेही उल्लंघन केले नाही. तथापि, एस्टोनियन सरकारने म्हटले आहे की शुक्रवारी तीन रशियन लढाऊ विमानांनी परवानगीशिवाय एस्टोनियन हवाई क्षेत्रात प्रवेश केला. तसेच सुमारे 12 मिनिटे उड्डाण केले. एस्टोनियाने निषेध म्हणून रशियन राजदूतांना बोलावले असून नाटोच्या कलम 4 अंतर्गत सल्लामसलत करण्याची मागणी केली आहे.