Sunday, August 31, 2025 05:47:07 PM

20 वर्षे कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाच्या 'स्लीपिंग प्रिन्स'चे निधन

वयाच्या 36 व्या वर्षी रियाध येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सौदी राजघराण्यासह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

20 वर्षे कोमात राहिल्यानंतर सौदी अरेबियाच्या स्लीपिंग प्रिन्सचे निधन
Sleeping Prince Death
Edited Image

रियाध: सौदी अरेबियाचे 'स्लीपिंग प्रिन्स' म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अलवालीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे 20 वर्षे कोमात राहिल्यानंतर निधन झाले. वयाच्या 36 व्या वर्षी रियाध येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सौदी राजघराण्यासह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, 2005 मध्ये 15 वर्षांचे असताना, लंडनमधील एका लष्करी अकादमीत प्रशिक्षण घेताना त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर ते कोमात गेले. गेली दोन दशके, त्यांना शुद्धीवर आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न डॉक्टरांनी आणि कुटुंबीयांनी केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत.

हेही वाचा - इराणमध्ये भीषण बस अपघात! 21 जणांचा मृत्यू, 34 जण जखमी

त्यांच्या दीर्घ कोमात असलेल्या अवस्थेमुळे जगभरात त्यांची ओळख Sleeping Prince म्हणून झाली होती. त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने उपचार सुरु होते. तथापी, सोशल मीडियावर वेळोवेळी त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट्स दिले जात होते. प्रिन्स अलवालीद यांच्यावर त्यांचे कुटुंब अत्यंत प्रेमपूर्वक उपचार करत होते. 

हेही वाचा - लॉस एंजेलिसमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित वाहनाने 20 हून अधिक लोकांना चिरडले

दरम्यान, आता अनेक वर्षांच्या वैद्यकीय संघर्षानंतर त्यांची अखेरची लढाई संपली. त्यांच्या निधनावर सौदी राजघराण्यातील वरिष्ठ सदस्यांनी दुःख व्यक्त केले असून, रियाधमध्ये त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकुमार अलवालीद यांचे निधन ही सौदी कुटुंबासाठी एक दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या कुटुंबात आणि सौदी समाजात शोककळा पसरली आहे. 


सम्बन्धित सामग्री