Monday, September 01, 2025 11:24:31 AM

रियालची किंमत घसरल्याने 'या' देशाने केली अर्थमंत्र्यांची हकालपट्टी

संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ म्हणाले की, 273 पैकी 182 खासदारांनी अब्दुलनासेर हेम्मतीच्या विरोधात मतदान केले. अर्थमंत्र्यांविरोधात संसदेत प्रस्ताव मांडून त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.

रियालची किंमत घसरल्याने या देशाने केली अर्थमंत्र्यांची हकालपट्टी
Abdolnaser Hemmati
Edited Image

Abdolnaser Hemmati Expelled from Parliament: रियालचे मूल्य घसरल्याने मध्य पूर्वेतील एका देशाने आपल्या अर्थमंत्र्यांना पदावरून हटवल्याती धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण इराणशी संबंधित आहे. सध्या इराणमध्ये रियालमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे रविवारी इराणच्या संसदेने देशाच्या अर्थमंत्र्यांना त्यांच्या चलन रियालच्या मूल्यात घसरण आणि आर्थिक गैरव्यवस्थापनाच्या कारणावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 

संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ म्हणाले की, 273 पैकी 182 खासदारांनी अब्दुलनासेर हेम्मतीच्या विरोधात मतदान केले. सभागृहात 290 जागा आहेत. अर्थमंत्र्यांविरोधात संसदेत प्रस्ताव मांडून त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. आता इराण अशा नवीन अर्थमंत्र्यांचा शोध घेत आहे, जो रियालची घसरण थांबवू शकेल आणि चलनाची किंमत वाढवू शकेल. 

हेही वाचा -  India's Q3 GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुधारली! तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर 6.2 टक्क्यांवर पोहोचला

इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या मंत्रिमंडळातील ही पहिलीच बरखास्ती असल्याचे म्हटले जाते. पेझेश्कियान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांनी ही बडतर्फी करण्यात आली आहे. इराणच्या या कृतीमुळे खळबळ उडाली आहे. रियाल सुधारण्यासाठी सर्व उपाययोजना आणि सूचनांवर मंत्रिमंडळ विचार करत आहे. 

हेही वाचा - IMF Prediction On Indian Economy: '2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश'; IMF ची मोठी भविष्यवाणी

दरम्यान, 2015 मध्ये, इराणी रियालची किंमत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 32 हजार होती, परंतु जुलैमध्ये पेझेश्कियान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात घसरली. अलिकडेच प्रादेशिक तणाव वाढल्याने, तेहरानच्या एक्सचेंज शॉप्समध्ये आणि रस्त्यांवर डॉलरच्या तुलनेत सुमारे 950,000 रियालमध्ये व्यवहार सुरू झाले. या महिन्यात नौरोज नवीन वर्ष जवळ येत असताना राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे आणि महागाईत वाढ झाल्यामुळे रियालच्या अवमूल्यनामुळे व्यापक सार्वजनिक असंतोष निर्माण झाला आहे.
 


सम्बन्धित सामग्री