Monday, September 01, 2025 05:32:06 AM

महालक्ष्मीची हत्या तिच्या प्रियकराकडून ?

महालक्ष्मी हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस अशरफ नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याला या गुन्ह्याचा मास्टरमाइंड मानले जात आहे. दरम्यान, महिलेच्या हत्येचा मुख्य संशयित तिचा सहकारी असू शकतो, मात

महालक्ष्मीची हत्या तिच्या प्रियकराकडून

बंगळुरु: महालक्ष्मी हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस अशरफ नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याला या गुन्ह्याचा मास्टरमाइंड मानले जात आहे. दरम्यान, महिलेच्या हत्येचा मुख्य संशयित तिचा सहकारी असू शकतो, मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. कर्नाटकच्या राजधानीत एका महिलेचा मृतदेह ५० पेक्षा जास्त तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. अद्याप पोलिसांनी त्या महिलेच्या सहकाऱ्याची ओळख जाहीर केलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, बंगळुरू पोलिसांनी महालक्ष्मीबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीची 'मुख्य संशयित' म्हणून ओळख केली आहे, त्या संशयित व्यक्तीचे नाव मुक्ति आहे. दोघीही एकत्र काम करत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुक्तीने महिलेच्या दुसऱ्या पुरुषाशी असलेल्या जवळच्या संबंधांचा विरोध केला होता. सध्या तरी पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.


सम्बन्धित सामग्री