Sunday, September 21, 2025 01:57:50 AM

SBI Bank Robbery: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एसबीआय बँकेवर दरोडा; 50 किलो सोने आणि 8 कोटी रुपयांची रोकड लुटली

चडचन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने शस्त्रांच्या जोरावर दरोडा टाकला.

sbi bank robbery कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात एसबीआय बँकेवर दरोडा 50 किलो सोने आणि 8 कोटी रुपयांची रोकड लुटली

SBI Bank Robbery: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी चडचन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने शस्त्रांच्या जोरावर दरोडा टाकला.

प्राप्त माहितीनुसार, लष्करी गणवेशात सज्ज पाच गुन्हेगार देशी बनावटीच्या पिस्तुल आणि इतर शस्त्रांनी सज्ज होऊन बँकेत घुसले. त्यांनी बँक व्यवस्थापक, कॅशियर आणि इतर कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. तसेच गंभीर परिणामांची धमकी दिली आणि त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर बँकेतील रोकड व सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले.

हेही वाचा - Mumbai Local Molestation Case: दादर रेल्वे स्थानकावर महिलेचा विनयभंग; 62 वर्षीय आरोपीला अटक

किती मुद्देमाल लंपास केला? 

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 50 किलो सोने आणि 8 कोटी रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लुटून नेल्याचा अंदाज आहे. दरोड्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोक बँकेबाहेर मोठ्या संख्येने जमले. तथापी, पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - Uttar Pradesh Crime : 'माझा जीव वाचला', म्हणत नवऱ्यानेच लावून दिलं बायकोचं दुसरं लग्न पण..., नेमकं झालं काय ?

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी चडचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे आणि सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.
 


सम्बन्धित सामग्री