Monday, September 15, 2025 08:50:00 AM

अनैतिक संबंधासाठी काढला बायकोचा काटा

बुलढाण्यातील दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

अनैतिक संबंधासाठी काढला बायकोचा काटा

बुलढाणा : बुलढाण्यातील दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात काही दिवसापूर्वी दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली होती. यामध्ये गजानन टेकाळे यांच्या पत्नीचा  मृत्यू झाला होता. पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या गजानन टेकाळे यानेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव केला असल्याचं उघड केलं आहे. 

हेही वाचा :  किन्नर आखाड्याने केली मोठी कारवाई; ममता कुलकर्णीला पदावरून हटवले, कारण काय?

अनैतिक संबंधासाठी बायकोचा काटा काढल्याची घटना घडली आहे. दरोडा झाल्याचा बनाव करत पत्नीला ठार केले आहे. या प्रकरणातील आरोपी पती गजानन काळे याला पोलिसांना अटक केली आहे. 

हेही वाचा : पुण्यात तीन दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

नेमकं घडलं काय? 

बुलढाणा जिल्ह्यातील दरोडा प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात काही दिवसापूर्वी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली होती. यामध्ये गजानन टेकाळे यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून दाभाडी गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या गजानन टेकाळे यानेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या  पत्नीला ठार करून दरोड्याचा बनाव केला असल्याचं उघड झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाने जिल्हाभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आरोपी गजानन टेकाळे याने पत्नी माधुरीला ऍसिडिटीचे औषध सांगून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्याचे चूर्ण करून प्यायला दिले होते. एवढेच नाही तर उशिराने तोंड दाबून तिचा जीव घेण्यात आला. कुणाला संशय होऊ नये म्हणून घरातील कपाट अस्ताव्यस्त करत स्वतःही झोपेच्या गोळ्या खाऊन बेशुद्ध झाला होता. मात्र मृत माधुरी टेकाळे यांचे शरीर निळसर पडले असल्याने आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या आक्षेपार्ह फोटोमुळे आरोपीला पोलिसी कसून चौकशी केली असता आरोपी गजानन टेकाळे यांने गुन्हा कबूल केला आहे.


जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


 


सम्बन्धित सामग्री