Sunday, August 31, 2025 06:49:12 AM

Anjali Arora Viral Video : 'कच्चा बदाम' रीलफेम या अभिनेत्रीचा थायलंडमधील क्लबमध्ये डान्स; नेटिझन्सच्या शॉकिंग प्रतिक्रिया

'कच्चा बदाम' या चित्रपटाने इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

anjali arora viral video  कच्चा बदाम रीलफेम या अभिनेत्रीचा थायलंडमधील क्लबमध्ये डान्स नेटिझन्सच्या शॉकिंग प्रतिक्रिया

मुंबई : 'कच्चा बदाम' या रीलनं इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी, ती एखाद्या चित्रपटासाठी किंवा शोसाठी नाही, तर थायलंडच्या एका क्लबमध्ये रात्री उशिरा झालेल्या नृत्यासाठी व्हायरल झाली आहे. या व्हायरल  व्हिडिओमध्ये ती गर्दीसोबत संगीताचा आनंद घेत असल्याचे दिसते. तिच्या या व्हिडिओवर काही यूजर्सनं तिला ट्रोल करत चित्रपटांच्या ऑफर संपल्यामुळे ती पब शोमध्ये गेली असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी तिला पाठिंबा देत म्हटले की, ती काम करत आहे, कमाई करत आहे आणि तिच्या पद्धतीने जीवन जगत आहे. त्यांच्यासाठी, क्लबमध्ये नाचल्याने तिची प्रतिभा किंवा प्रवास नष्ट होत नाही. 

 हेही वाचा : Gold-Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात उलटफेर! तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव जाणून घ्या

अंजली अरोरा आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. एमएमएस लीकच्या प्रकरणापासून ते तिच्या बोल्ड सोशल मीडिया पोस्टपर्यंत, तिला अनेकदा टीका सहन करावी लागली आहे. तिच्याशी जोडलेली प्रत्येक क्लिप गॉसिपचा विषय बनते. अद्याप या चर्चेवर अंजलीची प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापूर्वी अंजली ही लॉकअप या कंगना रनौत सूत्रसंचालन करत असलेल्या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांना दिसली होती. 


सम्बन्धित सामग्री