Venice Film Festival Award 2025: यंदा 82 व्या व्हेनिस चित्रपट महोत्सव भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉय यांनी त्यांच्या 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी ओरिझोन्टी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला. हा चित्रपट व्हेनिसच्या ओरिझोन्टी विभागात दाखल झालेला एकमेव भारतीय चित्रपट होता. अनुराग कश्यप प्रस्तुत ‘Songs of Forgotten Trees’ ही कथा मुंबईतील दोन स्थलांतरित महिलांच्या आयुष्याभोवती फिरते. एकाकीपणा, अस्तित्वासाठी संघर्ष आणि मानवी नात्यांतील नाजूक क्षण या चित्रपटाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत.
हेही वाचा - Ganpati Visarjan 2025: गणपती विसर्जनानंतर जुहू बीचवर अमृता फडणवीस व अक्षय कुमार स्वच्छता मोहिमेत सहभागी
दरम्यान, शनिवारी झालेल्या समारोप समारंभात ज्युरी अध्यक्षा आणि फ्रेंच चित्रपट निर्माती ज्युलिया डुकोर्नौ यांनी पुरस्काराची घोषणा केली. पांढऱ्या साडीत मंचावर पोहोचलेल्या अनुपर्णा रॉय यांनी भावनिक शब्दांत ज्युरी, कलाकार, निर्माते तसेच अनुराग कश्यप यांचे आभार मानले आणि हा क्षण त्यांच्यासाठी खूपचं खास असल्याची भावना वक्त केली.
हेही वाचा - Punjab Flood: 'ही सेवा आहे, देणगी नाही...'; पंजाबमधील पूरग्रस्त मदत कार्यासाठी अक्षय कुमारकडून 5 कोटींचे योगदान
अनुपर्णा रॉय या आधी 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रन टू द रिव्हर' या चित्रपटामुळे चर्चेत आल्या होत्या. आता 2025 मध्ये 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान मिळाला आहे. या चित्रपटात नाझ शेख आणि सुमी बघेल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत भूषण शिंपी, रवी मान आणि प्रीतम पिलानिया हेही प्रमुख भूमिकेत आहेत. अनुपर्णाच्या या कामगिरीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक मंचावर मोठा मान मिळाला आहे. तसेच या सन्मानाबद्दल सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.